हिंगोली : वसमत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीत घोळ

हिंगोली : वसमत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीत घोळ
Published on
Updated on

वसमत; पुढारी वृत्तसेवा : वसमत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रारुप मतदार यादीत घोळ झाल्याचे उघड झाले आहे. प्रभागात वास्तव्यास नसलेल्या नागरिकांची नावे मतदार यादीत असल्याने आ. राजुभैया नवघरे यांनी मुख्यधिकारी आशुतोष चिंचाळकर यांना जाब विचारत चांगलेच धारेवर धरले.

नगरपरिषद निवडणुकीकरीता २१ जुन रोजी प्रभागनिहाय मतदार याद्या प्रकाशित करण्यात आल्या. दि.२७ जुन पर्यंत हरकती घेण्याची शेवटची तारीख होती. सुमारे ४००० ते ५००० लोकसंख्येचे प्रभाग तयार करण्यात आले आहेत. पुर्वीच्या पंचवार्षिक निवडणुकीत वसमत शहरात १४ प्रभाग होते. पण नवीन रचनेनुसार एक प्रभाग वाढवण्यात आला असून सध्या १५ प्रभाग आहेत. या प्रभागांच्या प्रारूप मतदार यादीत अनेक प्रकारचे घोळ असल्याचे इच्छुक उमेदवारांच्या निदर्शनास आले. अनेक मतदार रहायला एका प्रभागात आणि मतदान दुसऱ्या प्रभागातील मतदार यादीत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून राजकीय दबावाखाली जाणीवपूर्वक बदल केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. तसेच प्रभाग क्र.९ मध्ये ७०० हून अधिक आक्षेप घेण्यात आले आहेत.

हेही वाचलंत का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news