हिंगोली : जवळाबाजार समिती संचालक निवडणुकीसाठी ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

हिंगोली : जवळाबाजार समिती संचालक निवडणुकीसाठी ४२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Published on
Updated on

जवळा बाजार, पुढारी वृत्तसेवा :  येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्वबळावरचा नारा प्रत्येक पक्षानेच उमेदवारी अर्ज दाखल केले होते. पण आता  एकूण १८ जागामध्ये  कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी -ठाकरे गट यांच्या विरुद्ध भाजप व काँग्रेस व शिवसेना मध्ये सरळ लढत गाजणार व  अपक्ष उमेदवारांनी सुद्धा या सर्व लढतीस डोकेदुखी ठरणार आहेत. २० एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता एकूण १७७ नामनिर्देशन अर्ज पैकी अर्ज १३२ मागे घेण्यात आले व निवडणुकीत आता १८ संचालक निवडणुकीत ४२ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत.

तर  राष्ट्रवादी  व  उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जागा वाटप समीकरण करून आघाडी विरुद्ध भाजप, काँग्रेस व शिंदे शिवसेना युती सरळ लढत होणार आहे. तर अपक्ष उमेदवार सुध्दा मोठ्या प्रमाणात आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील निवडणुकीत  आघाडीत १८ उमेदवार व युती १८ उमेदवार तर अपक्ष ९ उमेदवार निवडणुकीत उभे आहेत. यामुळे अपक्ष उमेदवार हे निवडणुकीमध्ये चांगलीच रंगत निर्माण करणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गट आघाडीमध्ये राखुंडे बाबाराव नारायण, ढोबळे ज्ञानदेव मुंजाजी, भालेराव शिवाजी कृष्णाजी, बोंगाने चंद्रकला रामजी, क्षीरसागर बालाजी गणपतराव ,काचगुंडे भगवान खंडबाराव, चव्हाण संजय सखाराम, सावंत उद्धव भगवानराव, भोंग शांताबाई गंगाधर, चोपडे शिवाजी कृष्णापा, गीते भानुदास सोपान, गायकवाड अंगद सुंदरराव, अंभोरे विनोद मारोतराव, कुरहे सुमित्रा नवनाथ, मानवते प्रतिभा रमेश ,झांजरी राजेश किशनलाल ,चव्हाण विश्वप्रसाद बाबुराव,सूर्योतळ राहुल अमनाजी एकूण १८ उमेदवार उभे आहेत. तर भाजप, काँग्रेस व शिवसेना युतीत आहेर अंकुश तातेराव, चव्हाण प्रभाकर रामकिशन, झटे ज्ञानेश्वर लक्ष्मणराव, बेंडे ओमकार अशोकराव, देशमुख लक्ष्मीकांत बाबुराव, कदम आनिल कैलासराव, शेळके संतोष साहेबराव, सावंत वैशाली रमेश, कावळे शारदाबाई भगवान, वैद्य दिलीप विठ्ठलराव, नागरे राम बाबाराव, चव्हाण रसवंता भुजंगराव, शेख मोहम्मद फैसल पटेल, ढोबळे गजानन भीमराव , खिल्लारे बालाजी गंगाराम, सोमानी श्रीराम सतीश, सिद्दिकी शकील अहमद, कीर्तने सुरेश प्रकाशरावतर ६ अपक्ष उमेदवार एकूण १८ संचालक निवडणुकीत ४२ उमेदवार रिंगणात आहेत.

हेही वाचंलत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news