Dharashiv Accident : भरधाव कारची धडक; महिलेचा मृत्यू

उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Dharashiv Accident
Dharashiv Accidentpudhari photo
Published on
Updated on

धाराशिव : कवठा पाटी येथे बसथांब्यावर उभ्या असलेल्या महिलेचा भरधाव कारच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राधिका बिभीषण भोगीले (वय 35, रा. कवठा ता. उमरगा जि. धाराशिव) या 12 मे 2026 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास कवठा पाटी येथील बसथांब्यावर एकुरगा येथे जाण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या होत्या. त्यावेळी एमएच 25 एजे 1785 क्रमांकाच्या कारचालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवत त्यांना जोरदार धडक दिली.

Dharashiv Accident
Ratnagiri Accident News : मुंबई-गोवा महामार्गांवर तुरळ येथे भीषण अपघात; चालकाचा जागीच मृत्यू

या अपघातात त्या गंभीर जखमी झाल्या व त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालकाने जखमी महिलेला उपचारासाठी न नेता घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

याप्रकरणी बिभीषण बळीराम भोगीले (वय 40, रा. कवठा ता. उमरगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Dharashiv Accident
Parbhani Accident : औशाजवळ कारचा भीषण अपघात चार ठार, दोघे जखमी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news