Dharashiv News : जागेच्या वादातून महिलेला मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखल

जागेच्य वादातून गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ करून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.
Dharashiv News
Dharashiv News : जागेच्या वादातून महिलेला मारहाण; पाच जणांवर गुन्हा दाखलfile photo
Published on: 
Updated on: 

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : जागेच्य वादातून गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ करून महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याप्रकरणी नळदुर्ग पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. पंचशीला नवनाथ लोंढे (वय ३८, रा. भीमनगर, मुर्दा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेअकराच्या सुमारास मुर्दा येथे जागेच्या वादातून प्रल्हाद बळी सुरवसे, अशोक प्रल्हाद सुरवसे, लक्ष्मी अशोक सुरवसे, मुक्ताबाई प्रल्हाद सुरवसे व शुभम सुधाकर कदम (सर्व रा. मुर्दा) यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून जातीवाचक शिवीगाळ केली.

Dharashiv News
Ujani Dam Water Release | उजनीतून धाराशिवला एक टीएमसी पाणी मिळणार; पुढील आवर्तनात पाणी सोडणार

तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून लोंढे यांना जखमी केले. याप्रकरणी दि. ७ नोव्हेंबर रोजी पंचशीला लोंढे यांच्या फिर्यादीवरून नळदुर्ग पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३५१ (२), ३५२, १८९(२), १९० तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम ३(१) (आर) (एस) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरील घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.

Dharashiv News
Dharashiv News : तुळजापूर तालुक्यात शेतकऱ्याने परत केली पाच हजारांची दुष्काळी मदत

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून कोयत्याने हल्ला; एकावर गुन्हा दाखल

धाराशिव : पोलिसांत तक्रार का दिली, या कारणावरून शिवीगाळ करत कोयत्याने हल्ला करून तरुणाला गंभीर जखमी केल्याप्रकरणी शिराढोण पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुरेश रमेश चौधरी (वय ३२, रा. लोहटा पं., ता. कळंब) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दि. ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लोहटा पं. शिवारात अशोक गुणवंत आडसुळ (रा. लोहटा पं.) याने पोलिसांत तक्रार का दिली, या कारणावरून चौधरी यांना शिवीगाळ केली. त्यानंतर कोयत्याने त्यांच्या डाव्या हाताच्या पोटरीजवळ वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी दि. ७ नोव्हेंबर रोजी सुरेश चौधरी यांच्या फिर्यादीवरून शिराढोण पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ११८(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.