Dharashiv Crime : उमरग्यात पोलिसांची सलग तिसरी मोठी कारवाई

Umarga Ganja Seizure : धाराशिव हादरले; २२ लाखांचा गांजा जप्त, आरोपीवर गुन्हा दाखल
Umarga Ganja Seizure
Umarga Ganja Seizurepudhari photo
Published on: 
Updated on: 

उमरगा : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावर्ती भागातील हिप्परगाराव वाडी शिवारात गांजाची बेकायदा लागवड आणि साठवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शुक्रवारी दोन स्वतंत्र कारवायांत सव्वातीन कोटींचा गांजा जप्त केल्यानंतर, शनिवारी (दि. १०) पुन्हा पोलिसांनी छापा टाकून २२ लाख ६८ हजार ५०० रुपये किमतीचा ४५ किलो ७९० ग्रॅम गांजा जप्त केला. अवघ्या दोन दिवसांत झालेल्या तीन मोठ्या कारवायांत तब्बल ६ क्विंटल ८७ किलो ७९० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे संपूर्ण राज्यभरात खळबळ उडाली आहे.

हिप्परगाराव वाडी येथील गायरान गट क्रमांक ३९/२/१ मधील जमिनीवर विठ्ठल खुबडे याने गांजाची लागवड केली होती. पोलिसांच्या कारवाईची चाहूल लागल्याने त्याने गांजाची झाडे उपटून चार गोण्यांत भरून साडीने झाकून ठेवल्याची गुप्त माहिती पोलीस मिळाली होती. या माहितीच्या आधारे नायब तहसीलदार प्रवीण काबरे, शासकीय पंच आणि फॉरेन्सिक पथकाच्या उपस्थितीत छापा टाकण्यात आला.

Umarga Ganja Seizure
Solapur Road Development : अक्कलकोट ते तडवळ सुसाट

यावेळी गोण्यांत सुकवून ठेवलेला ४५ किलो ७९० ग्रॅम गांजा आढळून आला. पोलिसांनी हा सर्व साठा जप्त केला असून, आरोपी विठ्ठल बसप्पा खवडे याच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत भराटे पुढील तपास करीत आहेत.

Umarga Ganja Seizure
Abhijit Dipke Detained : दीपके यांच्या आई-वडिलांची पंतप्रधान मोदी व अमित शहावर टीका

दोन दिवसांत सव्वातीन कोटींचा ६ क्विंटल गांजा जप्त

हिप्परगाराव वाडीत सलग तीन कारवायांत ६ क्विंटल ८७ किलो गांजा जप्त झाल्याने स्थानिक पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अवैध लागवड सुरू असताना स्थानिक बीट अंमलदार आणि गुप्तवार्ता यंत्रणेला सुगावा का लागला नाही, याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news