Solapur Road Development : अक्कलकोट ते तडवळ सुसाट

विकासकामांना वेग; रस्त्यांच्या जाळ्याने बदलतेय तडवळचे चित्र
Solapur Road Development
अक्कलकोट-जेऊर-तडवळ रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण पूर्ण करण्यात आले.pudhari photo
Published on: 
Updated on: 

हंजगी : एकेकाळी वीज, पाणी आणि रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष करणाऱ्या तडवळ भागातील जनतेच्या प्रश्नांना आता हळूहळू मार्ग मिळत आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या पाठपुराव्यामुळे या परिसरातील रस्ते विकासाला गती मिळाली असून, अनेक गावांना पक्क्या रस्त्यांची जोडणी मिळत आहे. त्यामुळे तडवळ भागातील दळणवळणाचे चित्र बदलू लागले आहे.

पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्यानंतर सचिन कल्याणशेट्टी यांनी तडवळ भागातील जनतेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. अक्कलकोट तडवळ हा या परिसरातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मार्ग आहे. काही वर्षांपूर्वी या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता.

Solapur Road Development
Abhijit Dipke Detained : दीपके यांच्या आई-वडिलांची पंतप्रधान मोदी व अमित शहावर टीका

रस्त्याची दुरवस्था झाल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता. मात्र, या मार्गाचे नव्याने सिमेंट काँक्रिटीकरण झाल्याने वाहतुकीला मोठी गती मिळाली आहे. एसटी बस, अवजड वाहने, चारचाकी, दुचाकी आणि रिक्षांचा प्रवास अधिक सुलभ झाला आहे. तडवळ भागात केवळ मुख्य रस्त्यांचाच नव्हे, तर गावांना जोडणाऱ्या अंतर्गत व जोडरस्त्यांचाही विकास होत आहे.

खानापूर-तडवळ, अंकलगी, आळगी-शेगाव-तडवळ, धारसंग-कल्लकर्जाळ, मुंडेवाडी-तडवळ, कोर्सेगाव-शेगाव,तडवळ-कुमठा, कुमठा-केगाव, चिंचोळी-केगाव-तडवळ, सुलेरजवळगी-तडवळ आणि सुलेरजवळगी-पानमंगरूळ या मार्गामुळे परिसरातील गावांच्या संपर्काला बळ मिळाले आहे.

याशिवाय अक्कलकोट ते टाकळी या सुमारे ५५ किलोमीटरच्या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम प्रगतिपथावर आहे. सुलेरजवळगी-करजगी, मुंडेवाडी-कोर्सेगाव-बरूर, पानमंगरूळ-कुडल-हिळ्ळी, आंदेवाडी बुद्रुक-आंदेवाडी खुर्द, शावळ-घुंगरेगाव-म्हैसलगी, खानापूर-अंकलगी आणि कल्लकर्जाळ-कोर्सेगाव या मार्गामुळेही अनेक गावांचा परस्पर संपर्क अधिक मजबूत होण्यास मदत होत आहे. पक्क्या रस्त्यांमुळे शेतकरी, विद्यार्थी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांनाही याचा फायदा होत आहे.

Solapur Road Development
Marathwada Graduate Election 2026 : पाटील ४८ कोटींचे, तर चव्हाण ३८ कोटींचे मालक

उर्वरित कामांनाही गती देण्याची मागणी

तडवळ भागातील खानापूर, हिळ्ळी आणि कोर्सेगाव येथील बंधारे जीर्ण झाले आहेत. याठिकाणी नवीन बंधारे बांधण्यासाठी मंजुरी मिळाली असली, तरी प्रत्यक्ष कामांना अद्याप सुरुवात झालेली नाही. याशिवाय शेतशिवारातील काही पाणंद रस्त्यांची कामेही प्रलंबित आहेत. या कामांना लवकर सुरुवात करून ती पूर्ण करावीत, अशी मागणी तडवळ भागातील शेतकरी आणि नागरिकांकडून होत आहे.

तडवळ भागातील रस्त्यांची दुरवस्था असल्याने पूर्वी अक्कलकोटला जाण्यासाठी नागरिकांचा बराच वेळ खर्च होत असे. मात्र, अक्कलकोट-तडवळ मार्गाचे सिमेंट काँक्रिटीकरण झाल्याने प्रवास अधिक वेगवान आणि आरामदायी झाला आहे. आता अक्कलकोटला जाऊन दोन तासांत कामे उरकून पुन्हा तडवळला परतणे शक्य होत असल्याची भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. विकासकामांमुळे वेळ, श्रम आणि वाहनांचा खर्च वाचण्यास मदत होत आहे.

रविकांत कुरे, शेतकरी खानापूर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news