Tuljabhavani Devi : तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक उत्साहात

Tuljabhavani Devi : तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक उत्साहात

Published on

धाराशिव : तुळजाभवानी देवीची नित्योपचार पूजा सोमवारी करण्यात आली. रविवारी रात्री छबिना मिरवणूक झाली. यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सोमवारी सकाळी 6 ते सकाळी 10 या वेळेत देवीस अभिषेक करण्यात आला. आरतीनंतर देवीचे विविध धार्मिक विधी पार पडले. (Tuljabhavani Devi )

तुळजाभवानी देवीच्या विविध अलंकार रूपातील पूजेस 18 तारखेपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या दिवशी रथ अलंकार महापूजा, 19 रोजी ललित पंचमीनिमित्त मुरली अलंकार महापूजा, 20 रोजी शेषशाही अलंकार महापूजा, 21 रोजी भवानी तलवार अलंकार महापूजा आणि 22 ऑक्टोबर रोजी महिषासुरमर्दिनी अलंकार महापूजा होणार आहे. (Tuljabhavani Devi )

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news