Dharashiv News : धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गावर जून २०२७ पर्यंत रेल्वे धावणार

आ. पाटील : भाविकांची होणार मोठी सोय
Dharashiva News
Dharashiva News : कृष्णा खोऱ्यातील ६.६६ टीएमसी पाण्यासाठी प्रयत्न : आमदार राणाजगजितसिंह पाटील File Photo
Published on
Updated on

Trains to run on the Dharashiv-Tuljapur railway line by June 2027

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : तुळजापूर येथे विमानतळ सुरू करण्याचा प्रस्ताव संबंधित विभागाकडे सादर करण्यात आला असून, तसेच धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गावर जून २०२७ पर्यंत रेल्वे धावणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.

Dharashiva News
Nanded Irrigation Project | कोलंबी उपसा सिंचन प्रकल्प पूर्णत्वास; नायगावच्या शेतकऱ्यांसाठी समृद्धीची नवी पहाट

प्रतिष्ठान भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. आमदार पाटील यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात मोठ्या प्रमाणावर विकासकामे झाली असून, देश नव्या उंचीवर पोहोचला आहे. शेतकरी, महिला, लघु उद्योजक तसेच विविध घटकांसाठी केंद्र सरकारने अनेक योजना राबवल्या असल्याचे त्यांनी नमूद केले.

धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेताना त्यांनी सांगितले की, धाराशिव-तुळजापूर रेल्वे मार्गाचे काम वेगाने सुरू असून, या मार्गावर जून २०२७ पर्यंत रेल्वे सेवा सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. तुळजापूर येथे शिर्डीच्या धर्तीवर विकास साधण्यासाठी विमानतळाचा प्रस्ताव विमान प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला असून, भाविकांच्या सुविधेसाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Dharashiva News
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला सुरुवात

दरम्यान, जागतिक बँकेच्या मदतीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पुराचे वाहून जाणारे पाणी धाराशिव जिल्ह्यात आणण्याचा प्रस्तावही सुरू असून त्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news