Tuljapur Municipal Council Election : तुळजापुरात नगराध्यक्षपदासाठी तिरंगी सामना

Tuljapur Municipal Council Election
Tuljapur Municipal Council Election : तुळजापुरात नगराध्यक्षपदासाठी तिरंगी सामनाFile Photo
Published on
Updated on

Three-way fight for the post of mayor in Tuljapur

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : तीर्थक्षेत्र असणाऱ्या तुळजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी सामना होणार आहे. अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी हे चित्र स्पष्ट झाले.

Tuljapur Municipal Council Election
Tulja Bhavani Mata : तुळजाभवानी मातेचा शाकंभरी नवरात्रौत्सव २० डिसेंबरपासून

महायुतीचे उमेदवार विनोद गंगणे यांच्यावर ड्रग्ज प्रकरणात आरोप झाल्याने सध्या महायुतीवर टिकेची झोड विर-ोधकांकडून उठविली जात आहे. तर महाविकास आघाडीच्या वतीने अमर मगर तर अपक्ष म्हणून महंत इच्छागिरी महाराज रिंगणात आहेत.

सुशिक्षित मतदारांनी आता ड्रग सारख्या प्रकरणात आरोपी असणाऱ्या महायुतीचे उमेदवार विनोद गंगणे यांना पराभूत करण्यासाठी महाविकास आघाडीचे सुशिक्षित आणि कोणताही आरोप नसणारे उमेदवार अमर मगर यांना मतदान करावे असे आवाहन जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी केले आहेत.

Tuljapur Municipal Council Election
Dharashiv News : उसाच्या ट्रॉलीखाली चिरडून महिलेचा मृत्यू

शिवसेनेचे नेते ऋषिकेश मगर यांनी याप्रकरणी पडद्यामागे महत्त्वाचे सूत्र चालवले आहे. तर शहराची होणारी बदनामी, तीर्थक्षेत्रामध्ये भाविकांना मिळणाऱ्या अपुऱ्या सुविधा याशिवाय ठराविक लोकांची राजकारणातील मक्तेदारी दूर करण्यासाठी राजसत्ता असणाऱ्या महंत इच्छागिरी महाराज आणि महंत मावजीनाथ महाराज यांनी शहरातील सज्जनशक्तीला सोबत घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय केला आहे.

महायुतीचे उमेदवार विनोद गंगणे यांनी मात्र विरोधक केवळ बदनामी करण्याचे काम करीत आहेत. त्यांना विकास कामाचे देणे घेणे नाही. त्यांनी पहिल्यांदा विकास कामावर बोलावे आपण त्यांना विकास कामातून उत्तर देऊ असे उत्तर दिले आहे. तुळजापुरात राज्य सरकारकडून ८६५ कोटी रुपयांचा विकास निधी दिला जात असल्याचा प्रचार देखील या निवडणुकीत होत आहे.

तुळजापूर शहरातील पुजारी व्यापारी आणि शहराचे अर्थकारण वाढवून दरडोई उत्पन्न तीन पट करण्याचा शब्द या निवडणुकीत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिला आहे. सध्या तरी आरोप, प्रत्यारोप आणि तुळजाभवानी मंदिराचा विकास याच्याभोवती तुळजापूर नगर परिषदेची निवडणूक रंगली आहे. मतदार या प्रचाराला मतदान यंत्रातून कसा प्रतिसाद देतात यावरच शहराचे कारभारी ठरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news