

The Shakambhari festival was celebrated with great enthusiasm in Bhum
भूम, पुढारी वृत्तसेवा : श्री चौंडेश्वरी शाकभंरी महोत्सव मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांनी साजरा केला. या दरम्यान समाजातील नव नियुक्त नगरसेवका बरोबरच कबड्डी स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर चमकदार खेळ करणाऱ्या वैष्णवी बावर हिचा सन्मान केला.
समस्त कोष्टी समाज बांधवांच्यावतीने दरवर्षी श्री चौंडेश्वरी शाकंभरी महोत्सव साजरा केला जातो यावर्षी देखील हा महोत्सव २४ डिसेंबर ते ३ जानेवारी पर्यंत हा महोत्सव साजरा केला जातो. या महोत्सवादरम्यान विजय बागडे सोमनाथ बाबर. संदिपान हासेगावकर संजय पाचपोर संभाजी मेहणकर. ज्ञानेश्वर जळकेकर जयेश 'भाग्यवत . अक्षय भोसले. गोविंद गोरे शारंगधर मेहणकर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम झाला.
कीर्तन कालावधीत रक्तदान शिबिरही घेण्यात आले, मसा खंडेश्वरी तालुका कळंब येथील २० कलाकारांनी भारुडाचे गीत गायन करून लक्ष देऊन घेतल, ३ जानेवारी २०२६ रोजी शाकंभरी महोत्सवाचा मोठ्या महाप्रसादाने समारोप झाला, या दिवशी शाकंभरी देवीची पालखी व प्रतिमेची शहराच्या प्रमुख मार्गान सवाध्य मिरवणूक काढली.
पालखी मिरवणुकीदरम्यान ठीक ठिकाणी पालखीचे स्वागत केले, खामकर गल्ली येथे शंकर खामकर, धनंजय खामकर, श्रीहरी खामकर, गणेश खामकर, कांतलिंग खामकर परिव-राराच्या वतीने महाप्रसाद वाटप केला, ठिकठिकाणी महिलांनी रांगोळी काढून स्वागत केले.
मिरवणुकीमध्ये श्री चौंडेश्वरी महिला ढोल ताशा पथक व रावसाहेब पाटील वारकरी शिक्षण संस्था मेडशिंगच्या बाल वारकरी बांधवांनी देखील लक्ष वेधून घेतले. सायंकाळी होम मिनिस्टर खेळ पैठणीचा कार्यक्रम झाला यावेळी देखील महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.