

Saudagar has assumed the charge of the mayor's post.
परंडा, पुढारी वृत्तसेवा :
नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाचा पदभार शिवसेना (शिंदे गट) चे जाकीर सौदागर यांनी शुक्रवार, दि. २ जानेवारी रोजी अधिकृतरीत्या स्वीकारला. नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सुरेखा कांबळे यांनी नगराध्यक्ष पदाचे अधिकृत पत्र देत सौदागर यांना पदभार प्रदान केला.
परंडा नगरपरिषदेच्या झालेल्या निवडणुकीत आमदार तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (शिंदे गट) कडून जाकीर सौदागर यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी सर्वपक्षीय जनशक्ती नगर विकास आघाडीचे उमेदवार विश्वजीत पाटील यांचा १८९ मतांनी पराभव केला होता.
नगराध्यक्ष पदग्रहण सोहळा परंडा नगरपरिषद कार्यालयात उत्साहात पार पडला. यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुष्पहार घालून जाकीर सौदागर यांचा जंगी सत्कार केला. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना जाकीर सौदागर म्हणाले की, निवडणुकी दरम्यान जनतेला दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करण्यात येतील.
या सोहळ्यास दत्ता साळुंके, रामचंद्र घो-गरे, दत्ता महाराज रणभोर, अनिल देशमुख, राजकुमार देशमुख, मसरत काझी, संदीप शेळके, नागनाथ नरुटे पाटील, माऊली गोडगे, विशाल देवकर, रत्नकांत शिंदे, वाजीद दखनी, वैभव पवार, वाहेद सौदागर, मदन दीक्षित, गणेश भानवसे, दिलीप रणभोर, अमजद मुजावर, संजय बनसोडे, मतीन जिनेरी यांच्यासह महिला व नागरिक उपस्थित होते.