स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ढोकी येथे रास्ता रोको आंदोलन

ऊसदर जाहीर न केल्यास उग्र आंदोलनाचा इशारा; वाहतूक ठप्प
Swabhimani Shetkari Sanghatana
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ढोकी येथे रास्ता रोको आंदोलनFile Photo
Published on
Updated on

Swabhimani Shetkari Sanghatana's road blockade protest at Dhoki

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील साखर कारखानदार तसेच गूळ पावडर कारखानदार यांनी चालू वर्षातील एफआरपी जाहीर न करताच ऊस गाळप चालू केले आहे. त्यामुळे उसाला ३५०० रूपये पहिली उचल मिळावी या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ढोकी येथे मुख्य चौकात शुक्रवारी (दि.२१) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. लवकरात लवकर दर जाहीर न केल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष इंगळे यांनी यावेळी दिला.

Swabhimani Shetkari Sanghatana
Dharashiv News : उसाच्या ट्रॉलीखाली चिरडून महिलेचा मृत्यू

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने यापू वींही जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देवून कारखान्यांना एफआरपी जाहीर करण्याची मागणी केली होती. तसेच रास्तारोको आंदोलन करण्याबाबतही कळविले होते. धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि गुळ पावडर ००१ कारखानदार यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून बेकायदेशीर गाळप करून ऊस उत्पादक शेतकन्यांची चेष्टा केली आहे.

या अगोदर वेळोवेळी प्रशासनाला लेखी निवेदन देऊन सुद्धा प्रशासनाने सुद्धा कोणती दखल घेतलेली नाही चालू हंगामातील पहिली उचल ३५०० मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ढोकी येथे मुख्य चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याशिवाय वेळीच प्रशासनाने दखल घेतली नाही तर स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी, साखर सम्राटांच्या बगलबच्च्यांनी ऊसदर न ठरवता गाळप चालू करून शेतकऱ्यांच्या अन्नात माती घातली आहे.

Swabhimani Shetkari Sanghatana
Tuljapur Municipal Council Election : तुळजापुरात नगराध्यक्षपदासाठी तिरंगी सामना

त्यास संपूर्ण प्रशासन सुद्धा जबाबदार आहे. जिल्ह्यातील काही कारखानदारांनी साखर गाळप परवाना न घेता ऊस तोड सुरू केली आहे. काटामारी, रिकव्हरी चोरी, एफआरपीचे तुकडे करून दर ठरवणे ही खुली लुट खुलेआम सुरू आहे. आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेऊन या साखर सम्राटांना पाठिशी घालत आहे.

परंतु यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना कोणाचेही लाड खपवून घेणार नाही त्यामुळे वेळीच उसाचा योग्य दर जाहीर करून शेतकऱ्यांची पिळवणूक थांबवावी अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचेही जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी म्हटले आहे. या आंदोलनात संघटनेचे धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, धनाजी पेंदे, विष्णूदास डाळे, सचिन ठेले यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news