NEET Exam 2024 : नीट परिक्षा पुन्हा घ्या; धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांची मोर्चाद्वारे मागणी

NEET Exam 2024 : नीट परिक्षा पुन्हा घ्या; धाराशिवमध्ये विद्यार्थ्यांची मोर्चाद्वारे मागणी

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : कधी नव्हे तो अभूतपूर्व गोंधळ नीट परिक्षेत घातला गेला आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. हे पाहता सरकारने नीट परिक्षा पुन्हा घ्यावी, अशी मागणी करीत विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलच्या विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारी (दि.२०) दुपारी हा मोर्चा काढला. त्यानंतर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊन त्यांनी मागण्या सादर केल्या.

निवेदनात म्हटले आहे, की अपार मेहनत करुन, भविष्याची स्वप्नं बघत परीक्षा देत असतो. आमच्या भविष्याशी, संपूर्ण कुटुंबाच्या स्वप्नांशी क्रूर खेळ होत आहे. एरवी ६०० गुणांना सरकारी वैद्यकीय कॉलेजमध्ये प्रवेश मिळतो. तर ह्यावर्षी ६९० घेतलेले त्रासून गेले आहेत. त्यांना प्रवेशाची खात्री नाही. त्यामुळे नीट परीक्षा रद्द करून ती पुन्हा नव्याने घेण्यात यावी. यावेळी विद्यार्थ्यासोबतच संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, संस्थेचे प्रशासकीय अधिकारी  एस. एस. देशमुख, प्राचार्य  एन. आर. नन्नवरे, उपप्राचार्य  एस. के. घार्गे, पर्यवेक्षक  एम. व्ही. शिंदे तसेच छत्रपती शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक पी. एन. पाटील व भोसले उच्च माध्यमिक विद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news