

Remove the garbage depot in Dharashiv; otherwise, there will be a protest
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : शहरातील नागरी वस्ती, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालयांलगत असलेला कचरा डेपो तातडीने कायमस्वरूपी स्थलांतरित करावा, अशी मागणी युवा सेना जिल्हाप्रमुख रविंद्र वाघमारे आणि नगरसेवक पंकज पाटील यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयाकडे केली आहे. याप्रश्नी तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
शहरातील विविध भागांतील कचरा अनेक वर्षांपासून या डेपोमध्ये टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. माशा, डास आणि भटक्या जनावरांचा उपद्रव वाढला असून, कचरा जाळल्यामुळे धुराचे लोट पसरत असल्याची तक्रार निवेदनात करण्यात आली आहे. याचा त्रास नागरिकांसह विद्यार्थी आणि रुग्णांना सहन करावा लागत आहे.
डेपोमध्य रुग्णालयांतील वैद्यकीय कचरा, औषधांच्या बाटल्या आणि मृत जनावरे टाकली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे तसेच कचऱ्यातून झिरपणारे दूषित पाण जमिनीत मुरल्याने विहिरी आणि बोअरवेलमधील पाणी दूषित होण्याची भीत व्यक्त करण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने डेपोची प्रत्यक्ष पाहण करून प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि कचऱ्याची शास्त्रोक्त विल्हेवाट सुनिश्चित करावी, अशी मागण करण्यात आली आहे.
तक्रारी, उपोषणानंतरही प्रश्न कायम
कचरा डेपो स्थलांतरासाठी जिल्हाधिकारी, नगर परिषद, पालकमंत्री आणि पर्यावरणमंत्र्यांकडे यापूर्वीही निवेदने देण्यात आली आहेत. उपोषण करूनही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा दावा वाघमारे आणि पाटील यांनी केला. आता प्रशासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.