Tulja Bhavani : तुळजाभवानी देवीची देखणी रथ अलंकार महापूजा

श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील पाचव्या माळेला ललिता पंचमीनिमित्त देवीची पारंपरिक रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली होती.
Tulja Bhavani
Tulja Bhavani : तुळजाभवानी देवीची देखणी रथ अलंकार महापूजाfile photo
Published on: 
Updated on: 

Tulja Bhavani Devi's beautiful chariot decoration Maha Puja

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील पाचव्या माळेला ललिता पंचमीनिमित्त देवीची पारंपरिक रथ अलंकार महापूजा मांडण्यात आली होती. सात घोड्यांच्या रथाचे सारथ्य करणाऱ्या देवीचा हा देखणा आणि नेत्रदीपक आविष्कार पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मंदिरामध्ये प्रचंड गर्दी केली. 'आई राजा उदो उदो'च्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.

Tulja Bhavani
Dharashiv News : चेष्टा करू नका; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या !

या महोत्सवासाठी महाराष्ट्रासह शेजारील आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक तुळजापुरात दाखल झाले आहेत. मध्यरात्री १ वाजता मंदिरात प्रक्षाळ पूजा संपन्न झाल्यानंतर, भाविकांसाठी धर्मदर्शन आणि मुखदर्शनाच्या रांगा सुरू करण्यात आल्या. सकाळी ७वाजता मुख्य अभिषेक पूजा सुरू झाली; त्यानंतर पारंपरिक नित्योपचार, महाआरती व महानैवेद्य अर्पण करण्यात आला. मंदिराचे पुजारी सचिन परमेश्वर, अतुल मलवा यांच्यासह अन्य पुजाऱ्यांनी देवीच्या मूळ मूर्तीची आणि चांदीच्या सिंहासनाची अत्यंत आकर्षक सजावट केली होती.

धार्मिक आख्यायिकेनुसार, भगवान सूर्यनारायण यांनी त्रिलोक भ्रमणासाठी आपला भव्य रथ श्री तुळजाभवानी मातेला दिला होता. रात्रीच्या वेळी काढण्यात आलेल्या पारंपरिक छबिना मिरवणुकीलाही हजारो भाविकांची लक्षणीय उपस्थिती लाभली होती.

या सोहळ्यासाठी उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार माया माने, नगर परिषदेचे मुख्याधिकारी अजिंक्य रणदिवे, सर्व पुजारी, सेवेकरी आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

Tulja Bhavani
Tuljapur Navratri Festival : दुष्काळाच्या सावटाखाली, कडक उन्हात भरली तुळजापूरची नवरात्र यात्रा

पिण्याच्या पाण्याअभावी भाविकांचे हाल

नवरात्रोत्सवासाठी लाखो भाविक आलेले असताना मंदिर परिसर आणि मुख्य बसस्थानक परिसरात पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने भाविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. बिडकर तलाव मार्गावरून दर्शन मंडपापर्यंत पायी येताना वृद्ध, लहान मुले आणि महिला भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावाबाबत भाविकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news