Dharashiv News : भूम शहरात जगदंबा मंदिरात नवरात्रोत्सवाचा जागर

५१ वर्षांपासून एकाच कुंभाराकडून घट आणण्याची परंपरा, तीनशे वर्षांचा वारसा
Dharashiv News
Dharashiv News : भूम शहरात जगदंबा मंदिरात नवरात्रोत्सवाचा जागर file photo
Published on: 
Updated on: 

Dharashiv News: Navratri festival celebrations at the Jagadamba temple in Bhum city

भूम, पुढारी वृत्तसेवा : ऐतिहासिक वारसा, धार्मिक श्रद्धा आणि पिढ्या‌न्पिढ्या जपल्या जाणाऱ्या परंपरांचा संगम असलेल्या भूम येथील ऐतिहासिक श्री जगदंबा मंदिरात शारदीय नवरात्र महोत्सव उत्साहात साजरा होत आहे. सुमारे तीनशे वर्षांची परंपरा लाभलेल्या या मंदिरात विविध धार्मिक विधी, महाआरती, महाप्रसाद आणि अन्य कार्यक्रमांद्वारे आदिशक्तीचा जागर सुरू आहे.

Dharashiv News
Yermala Yedeshwari Devi Temple : विद्युत रोषणाईने उजळले येडेश्वरी मंदिर

उपलब्ध माहितीनुसार, मंदिराची स्थापना १७१० च्या सुमारास झाल्याचे सांगितले जाते. गणाजी भोसले (सुपेकर) हे भोप्याचे रूप धारण करून भूम येथे आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सांगण्यावरून विनायक झगडे यांच्या मदतीने जगदंबा मंदिराची स्थापना झाल्याची परंपरागत माहिती सांगितली जाते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या ५१ वर्षांपासून नवरात्रोत्सवासाठी एकाच कुंभाराकडून घट आणण्याची परंपरा जपली जात आहे.

घटस्थापनेच्या दिवशी गवळी कुटुंबीयांकडून दही-दूध आणून देवीला अभिषेक घालण्यात येतो. त्यानंतर महाआरती करून भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाते. नवरात्रोत्सवात एकता दौड, आराधी गाणी आणि अष्टमीला होमाचे आयोजन केले जाते. मंदिरात माहूरच्या रेणुकादेवीसह तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची गर्दी होते. मंदिरातील पूजा-अर्चेची जबाबदारी स्थापनेपासून सुपेकर कुटुंबीयांकडे परंपरेने चालत आली आहे. पौर्णिमेला देवीचा छबिना, पोत खेळणे आणि पालखी मिरवणुकीने उत्सवाची सांगता होते.

Dharashiv News
Dharashiv News : चेष्टा करू नका; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या !

परंपरा आजही कायम

"नवरात्रोत्सवात घटस्थापना, महाआरती, महाप्रसाद, एकता दौड, आराधी गाणी आणि होमाचे आयोजन केले जाते. पौर्णिमेला छबिना व पालखी मिरवणूक काढण्यात येते असे पुजारी संतोष सुपेकर यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news