

Osmanabad Railway Station Rename Dharashiv
पुणे : उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार, भारतीय रेल्वेने उस्मानाबाद रेल्वे स्थानकाचे नाव धाराशिव रेल्वे स्थानक असे बदलले आहे. परिणामी, नवीन स्थानकाचे नाव आणि कोड भारतीय रेल्वे कॉन्फरन्स असोसिएशनने मंजूर केले आहे.
पूर्वी स्टेशन कोड UMD असलेले उस्मानाबाद म्हणून ओळखले जाणारे स्थानक आता अधिकृतपणे धाराशिव असे नवीन स्थानक कोड DRSV सह बदलण्यात आले आहे. त्यानुसार, स्थानकाचे नवीन नाव पुढील पद्धतीने वाचले आणि लिहिले जाईल
देवनागरी लिपीत (मराठी): धाराशिव
देवनागरी लिपीत (हिंदी): धाराशिव
रोमन लिपीत (इंग्रजी): DHARASHIV
धाराशिव हे नवीन नाव प्रतिबिंबित करण्यासाठी सर्व रेल्वे रेकॉर्ड, चिन्हे, घोषणा आणि प्रवासी माहिती प्रणाली अद्ययावत केल्या जातील असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवाशांना आणि सामान्य जनतेला या बदलाची नोंद घेण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
नाव बदलाची अंमलबजावणी करण्यासाठी, मुंबई प्रवासी आरक्षण प्रणाली (पीआरएस) तात्पुरती १ तास ४५ मिनिटांच्या कालावधीसाठी, दिनांक ३१.०५.२०२५ रोजी रात्री २३:४५ ते दिनांक ०१.०६.२०२५ रोजी मध्यरात्री ०१:३० पर्यंत बंद केली जाईल. या बंद कालावधीत, उस्मानाबाद स्थानकाचे धाराशिव असे नामकरण करण्याशी संबंधित बदल आणि आवश्यक अपडेट्स केले जातील.