केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी घेतले तुळजाभवानीचे दर्शन

तुळजापूर; पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपल्या पत्नीसह आज (दि.२५) महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले.

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांनी त्यांचे हेलीपॅड येथे स्वागत केले. त्यानंतर राणे यांनी सकाळी साडेदहा वाजता आपल्या पत्नीसह तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांच्या पत्नी नीलम राणे यांनी खण-नाराळानं देवीची ओटी भरली. व देवीची आरती करून आशिर्वाद घेतला. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील, संतोष बोबडे व गुलचंद व्यवहारे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news