

Many stories of Mayor Patil's discipline
सुधाकर झोरी
उस्मानाबाद नगरपरिषदेच्या अनेक ऐतिहासिक घटनांचे शिल्पकार व साक्षीदार असलेले माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी नगरपालिकेत सन १९६७ पासून नगरसेवक म्हणून राजकीय कारकिर्दीस सुरुवात केली. नगरपरिषदेचे ते १९७२ ते १९७४ या काळात नगरसेवक निवडीतून नगराध्यक्ष तर १९७४ ते १९७८ थेट जनतेतून नगराध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक जनहिताचे कल्याणकारी निर्णय घेतले.
नगरपरिषदेच्या कामकाजात बारीकसारीक ारे नगरपालिकेने जिल्हाधिकारी गोष्टीकडे नगराध्यक्ष असताना श्री. पाटील लक्ष देत. सकाळी नगरपालिकेत दैनंदिन कामकाज उरकून, दुपारच्या वेळी शहरात सायकलवरून फिरत असत. कचरा साठलेला असेल अथवा नाल्या तुंबलेल्या असतील तर त्या संबंधित विभागाला कळवून त्याच क्षणी कचरा आणि नाल्यांची साफसफाई करवून घेत असत.
नगरपरिषदेच्या प्रशासकीय कारभारावर जिल्हाधिकारी कार्यालयाचे नियंत्रण असते. तरीही नगराध्यक्ष पाटील यांनी साधारण १९७४ तत्कालीन उस्मानाबादचे जिल्हाधिकारी ए. पी. गिब्ज यांच्या जिल्हाधिकारी निवासाचे थकीत बिलापोटी नळ कनेक्शन तोडले होते. याबाबतचा किस्सा खूपच रंजक आहे. तत्कालीन विभागीय आयुक्त डी. एन. कपूर हे स्वच्छ व कडक शिस्तीचे म्हणून विख्यात होते.
त्यांची औरंगाबाद येथे बदली होण्यापूर्वी ते कोल्हापूर येथे महापालिका आयुक्त म्हणून कार्यरत असताना तत्कालीन एका मंत्र्यांचा बंगला रस्ता रुंदीकरणात त्यांनी पाडला होता. तो किस्सा त्यावेळी महाराष्ट्रभर गाजला होता. त्यामुळे कपूर यांची प्रशासकीय दहशत महाराष्ट्रात निर्माण झाली होती. दरम्यान जिल्हाधिकारी श्री. गिब्ज यांनी एका गोपनीय पत्राद्व-निवासाचे नळ कनेक्शन तोडल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे केली होती.
मात्र नगराध्यक्ष पाटील यांनी याबाबतची फाईल तयार ठेवण्याची सूचना अगोदरच पाणीपुरवठा विभागाला केली होती. आयुक्त कपूर यांनी गिब्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार याबाबत नगरपालिकेकडे विचारणा केली. त्यावेळी विभागीय आयुक्तांना कसे उत्तर द्यायचे यावर मुख्याधिकारी घाबरून गेले होते.
मात्र नगराध्यक्ष पाटील यांनी वेळो-वेळी जिल्हाधिकारी कार्यालयाला व सार्वजनिक बांधकाम विभागाला या संदर्भात दिलेली डिमांड, बिले, नळ पुरवठा खंडित करण्याची १४७ची बजावलेली नोटीस याची इत्यंभूत माहिती आयुक्तांकडे सादर केली. यावर नगराध्यक्ष पाटील यांनी एखाद्या गरीब नागरिकाचे नळ बील थकल्यावर कनेक्शन तोडतो, त्याच न्यायाने आम्ही जिल्हाधिकारी निवासाचे नळ कनेक्शन तोडल्याचे स्पष्ट केले.
ज्यांच्या नियंत्रणाखाली नगरपालिका कामकाज करतात त्यांच्या कडून सहकार्याची अपेक्षा असते. यामुळे आम्ही चुकीचे काही केले नाही. कसा युक्तिवाद केला त्याने आयुक्त कपूर खूपच प्रभावित झाले. त्यांनी जिल्हाधिकारी गिब्ज यांनाच यांची थकीत बिले तात्काळ अदा करण्याची सूचना करीत दोन दोन वर्ष नगरपालिकेचे आपण पैसे थकविल्यास पालिकेचा कारभार कसा चालणार, अशा शब्दांत सुनावले.