

Dharashiv News: Many people are having to leave school at a young age
समाधान डोके
ईट, पुढारी वृत्तसेवा : शासनाने साखरशाळा, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी नजीकच्या शाळेत व्यवस्था आदींच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न केले. परंतु, भूम तालुक्यातील ईट परिसरात ऊसतोडणी मजुरांसोबत अनेक शालेय विद्यार्थी शाळा सोडून उसाच्या फडात जुंपलेली दिसत आहेत.
सध्या सर्वत्र उसतोडणी हंगाम सुरू आहे. ईटसह परिसारातील आंदुड, लांजेश्वर, डोकेवाडी, पांढरेवाडी, निपाणी, गिरवली आदीसह गावांमध्येही ही तोडणी सुरू आहे. या तोडणीसाडी कोठे गावटोळी तर कोठे बाहेरच्या गावातील ऊसतोड कामगार उसाच्या फांमध्ये तोडणी करताना दिसून येत आहेत. मात्र, बाहेरून आलेल्या ऊसतोड कामगारांची लहान मुले-मुली त्यांच्याबरोबरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यामुळे या लहान मुलांची शिक्षणाची आबाळ होत आहे. अनेक मुलांचे कित्येक वर्षे त्यांच्या आई वडिलासोबत निघून जातात आणि शेवटी मोठे झाल्यावर तेही या कामात जुंपून घेतात, असे हे चक्र सुरू आहे. या मुलांच्या शिक्षणासाठी असलेल्या साखरश ाळांची संबंधितांकडून व्यवस्था होत नसल्यामुळे या मुलांच्या शिक्षणाचे भवितव्य अंधारात हेलकावे खात आहे. ईटसह
परिसरातील आंद्रूड, लांजेश्वर, निपाणी, डोकेवाडी आदी गावांत ऊसतोडणी जोरात चालू आहे. या ऊस तोडणीसाठी गावातील व काही जोतीबाचीवाडी, नागेवाडी, पखरुड आदी गावातील शेतकरी आपल्या जनावरांना चारा म्हणून उस तोडणीसाठी येत आहेत.
शासनाने ऊसतोडीच्या काळात विस्थापित होणाऱ्या हजारोंच्या संख्येतील कामगारांच्या संख्येमुळे त्यांच्या पाल्यांची शिक्षणाची गैरसोय होऊ नये यासाठी साखरशाळा सुरू केल्या. परंतु, या शाळा कोठे आहेत, याचा थांगपत्ताच नाही.
परिणामी आपले आई-वडील उस तोडणीसाठी आल्यामुळे त्यांना हि त्यांच्या बरोबर आपले उद्या चे भविष्य सोडून व शिक्षण सोडून यावे लागत आहे. उस हंगामा हा तीन ते चार महिने चालतो. त्यामुळे या चिमुकल्या चार ते पाच महिने वही व पेन आणि आपल्या शाळेसह शिक्षकांची भेट होत नाही.
रोजगारासाठी विस्थापित होणाऱ्या भागात मजुरांच्या पाल्यांसाठी साखरशाळा गरजेच्या आहेत. गिरलगाव, मुंगेवाडी, पखरुड या ची तालुक्यातील गावांसह हिंगोमुलली धुळे, नंदुरबार जिल्ह्यातील तसेच राज्यच्या बाहेरील मध्येप्रदेश येथील मोठ्या प्रमाणात ऊसतोड कामगार आलेले आहेत. आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी लेकरा-बाळांसह ऊस कामगारांच्या टोळ्या दाखल झाल्या आहेत. त्यांच्यासोबत काही मोठी आणि काही चिमुकलेही आहेत.
अर्ध्यावर शाळा सोडून आलो
मी सध्या सातव्या वर्गात शिकत आहे. दिवाळीपर्यंतच शाळा केली. घरी कोणीच नसल्यामुळे आई-वडिलांबरोबर अर्ध्यावरच शाळा सोडून यावे लागले. शिकायची इच्छा आहे पण पर्याय नाही असे विद्यार्थी विजय इंगले यांनी सांगितले.
मी ९ वीला होतो. कारखाना सुरू झाल्यावर शाळा सोडून आई-वडिलांबरोबर यावे लागले. शिक्षणाची इच्छा असून पर्याय नाही. शासनाने आमच्यासाठी काही तरी करायला पाहिजे, असे शुभम गिरी यांनी सांगितले.