Dharashiv drought situation: पिके करपली; तातडीने मदतीची गरज

लोहारा : चारा छावण्या, पाणीटंचाईवर तातडीच्या उपाययोजनांची मागणी
Dharashiv drought situation
Dharashiv drought situationpudhari photo
Published on: 
Updated on: 

कालिदास गोरे

लोहारा : पावसाने मोठी ओढ दिल्याने लोहारा तालुक्यासह परिसरातील खरीप पिकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत उभी असलेली सोयाबीन, तूर, मूग, उडीद आदी पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांमध्ये संताप आणि आक्रोश निर्माण झाला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री, मंत्री व लोकप्रतिनिधींचे पाहणी दौरे आणि पंचनाम्यांपेक्षा तातडीने भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

यंदा सुरुवातीला पावसाने साथ दिल्याने पिकांची उगवण चांगली झाली. मात्र त्यानंतर पावसाने दीर्घ खंड दिल्याने जमिनीतील ओलावा संपला आणि पिकांची वाढ खुंटली. अनेक भागांत सोयाबीनचे पीक पूर्णपणे करपले असून, तूर, मूग व उडीद पिकांनाही मोठा फटका बसला आहे. काही ठिकाणी पिके हिरवी दिसत असली तरी फुलोरा आणि शेंगा न लागल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

Dharashiv drought situation
illegal sand mining : अंबडच्या वाळू प्रकरणामुळे बीडचे तहसीलदार शेळके चर्चेत

पावसाच्या प्रत्येक नक्षत्राकडे शेतकरी आशेने पाहत होता. मात्र एकापाठोपाठ नक्षत्रे कोरडी गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत. पेरणी, बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर झालेला खर्च वाया जाण्याची भीती आहे. पिकांसोबतच ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.

Dharashiv drought situation
Jalna festival special train : सणासुदीच्या गर्दीसाठी दिल्ली, छपरासाठी विशेष रेल्वेगाड्या

विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीत घट होत असून, शेतातील चारा करपल्याने पशुपालकांसमोर जनावरे सांभाळण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे गरज असलेल्या भागात तातडीने चारा छावण्या सुरू कराव्यात, अशी मागणी होत आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यासोबतच १०० टक्के पीकविमा नुकसानभरपाईसाठी तातडीने कार्यवाही करावी. ई-पीक पाहणी १०० टक्के पूर्ण करून त्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशीही मागणी आहे.

प्रमुख मागण्या

भरीव आर्थिक मदत, पीकविमा नुकसानभरपाई, चारा छावण्या आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना कराव्यात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

पुणे शहरातील सर्व अपडेट्स आता WhatsApp वर; आत्ताच जॉईन करा
logo
Pudhari News
pudhari.news