India US trade deal protest : भारत-अमेरिका व्यापार करार रद्द करा

युवक काँग्रेसचे आंदोलन; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
India US trade deal protest
धाराशिव : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे सत्याग्रह करण्यात आला. pudhari photo
Published on
Updated on

धाराशिव : केंद्र सरकारकडून प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापार करार शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि अन्नसुरक्षेसाठी घातक ठरणार असल्याचा आरोप करत युवक काँग्रेस, धाराशिवच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात म्हटले आहे की, या करारानुसार अमेरिकेतील कृषी उत्पादनांना शून्य टक्के आयात शुल्क लागू होण्याची शक्यता असून त्यामुळे स्वस्त परदेशी माल भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर येईल. परिणामी, भारतीय शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळणार नाही आणि त्यांच्या उत्पन्नावर गंभीर परिणाम होईल.

India US trade deal protest
Nagpur congress news | मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अपमानाविरोधात युवक काँग्रेसचा संताप, पुतळा जाळला

भारतातील बहुतांश शेतकरी हे लहान व अल्पभूधारक असून त्यांच्याकडे आवश्यक साधनसामग्री व सरकारी मदत मर्यादित आहे. अशा परिस्थितीत परदेशातील अनुदानित व प्रगत शेतकऱ्यांशी स्पर्धा करणे कठीण ठरणार असल्याने हा करार शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हा करार तातडीने रद्द करण्यात यावा आणि शेतकऱ्यांचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे.

India US trade deal protest
Congress Protest Nagpur | नागपुरात भाजप, मोदी सरकारविरोधात युवक काँग्रेस रस्त्यावर

निवेदन देताना अभिजित चव्हाण, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गणेश फुलचंद पवार, धवलसिंह लावंड, हनुमंत सांगळे, धीरज सोनवणे, प्रशांत झेंडे, समर्थ कदम, महेश म्हेत्रे, संकेत पडवळ, मोईज सय्यद, सौरभ गायकवाड आदी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news