

नागपूर : आसामचे मुख्यमंत्री हिंमता सरमा यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याविषयी केलेले वक्तव्य हे केवळ राजकीय नव्हे तर सामाजिकदृष्ट्या घृणास्पद, अपमानास्पद आणि दलित समाजाच्या सन्मानावर थेट हल्ला करणारे आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस व नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने देवडिया काँग्रेस भवन समोर आज गुरुवारी सायंकाळी आंदोलन छेडण्यात आले.
“दलितांचा अपमान करणाऱ्यांना रस्त्यावर उतरून उत्तर देऊ”, “संविधानावर हल्ला सहन करणार नाही”, “भाजपचा मनुवाद हद्दपार करा” अशा आक्रमक घोषणांनी परिसर दणाणून गेला. संतप्त कार्यकर्त्यांनी हिमांता बिस्वा सरमा यांच्या प्रतिमेवर “जोडे मारो” आंदोलन करत तीव्र रोष व्यक्त केला तसेच पुतळ्याचे दहन करण्याचाही प्रयत्न केला.
परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्यता लक्षात घेता पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत आंदोलनकर्त्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आणि अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मात्र, यामुळे आंदोलनकर्त्यांचा रोष अधिकच भडकला.काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांना बेकायदेशीरपणे अटक करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचे नमूद करत, विरोधकांचा आवाज दडपण्याचे षडयंत्र सुरु असल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसने केला.
या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय युवक काँग्रेसचे सचिव व महाराष्ट्राचे सह प्रभारी नवज्योत सिंग संधू यांनी केले यावेळी नागपूर झोन इन्चार्ज कपिल ढोके,उपाध्यक्ष तनवीर विद्रोही, अनुराग भोयर, नागपूर प्रभारी रितेश पांडव, महासचिव अक्षय हेटे, रौनक चौधरी, आकाश गुजर, सागर चव्हाण,मेहुल डवाणी, हेमंत कातुरे,निखिल वानखेडे, नयन तरवटकर, अभिजित ठाकरे, रोमा चौधरी, राधिका देशमुख, कौस्तुभ शिर्के, फझलूर कुरेशी,रजा अली, समीर तिमांडे, साहिल मोहोड,अझहर शेख,नकील अहमद, मिथिलेश कन्हेरे, संदीप देशपांडे, श्रीकांत ढोणे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.