

BJP Modi government protest
नागपूर : भारतीय युवक काँग्रेस अध्यक्ष उदय भानू चिब यांना भाजपविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याने गैरसंविधानिक पद्धतीने अटक करण्यात आल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेस, महिला काँग्रेस पदाधिकारी,कार्यकर्ते गुरुवारी (दि.२६) सायंकाळी रस्त्यावर उतरले.
टिळक पुतळा महाल येथून भाजपच्या कार्यालयाकडे जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांशी अनेकदा झटापट झाल्याने वातावरण तापले. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे समर्थनार्थ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधात घोषणा,पोस्टर हाती घेतलेले कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्याची तयारी चालविली आहे. भाजप सरकारने सर्वसामान्य जनतेला वेठीस धरले असून शेतकऱ्यांचे अमेरिकन नव्या टेरिफमुळे मोठे नुकसान होणार आहे याकडे याद्वारे लक्ष वेधण्यात आले.
टिळक पुतळा चौक, महाल परिसरात हे न्याय – सत्याग्रह आंदोलन नागपूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आले. संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सुरू असलेल्या युवक काँग्रेसच्या या लढ्याला बळ देण्यासाठी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, आजी,माजी नगरसेवक, महिला काँग्रेस, एन.एस.यू.आय. पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.