Dharashiv News : चेष्टा करू नका; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या !

आ. पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी
Dharashiv News
Dharashiv News : चेष्टा करू नका; हेक्टरी ५० हजारांची मदत द्या !file photo
Published on: 
Updated on: 

Give assistance of Rs. 50,000 per hectare mla patil

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : पाच हजार रुपयांत शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची, असा सवाल करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाध्यक्ष आ. कैलास पाटील यांनी राज्य सरकारवर टीका केली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी हेक्टरी किमान ५० हजार रुपयांची भरीव मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Dharashiv News
Tuljapur Navratri Festival 2026 : तुळजाभवानी देवीच्या पारंपरिक छबिन्यासाठी भाविकांची मांदियाळी

राज्य मंत्रिमंडळाच्या बुधवारी (दि. १४) झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्याची घोषणा केली. या घोषणेवर प्रतिक्रिया देताना पाटील यांनी मदतीच्या रकमेवर नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, एक एकर सोयाबीन काढण्यासाठी पाच हजार रुपये मजुरी लागते. अशा परिस्थितीत पाच हजार रुपयांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे.

Dharashiv News
Dharashiv News : मुस्लिम समाजाचा डॉल्बी, बँजोला नकार !

सरकारने २६ सप्टेंबर रोजी दुष्काळ जाहीर केला. शेतातील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असून, सुमारे ८१ टक्के पंचनामे पूर्ण झाल्याचे सांगण्यात येत आहे. केंद्रीय पथकानेही पाहणी केली. तरीही नुकसानभरपाई देण्यास विलंब का होत आहे, असा सवाल त्यांनी केला. दुष्काळामुळे खरीप हंगाम वाया गेला असून, रब्बीच्या पेरणीची शक्यताही कमी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अशा वेळी जुन्या मदतनिकषांत न अडकता उत्पादन खर्च लक्षात घेऊन भरपाई द्यावी, असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news