Tuljapur Navratri Festival 2026 : तुळजाभवानी देवीच्या पारंपरिक छबिन्यासाठी भाविकांची मांदियाळी

दुसऱ्या माळेला दर्शनासाठी उसळली गर्दी
Tuljapur Navratri Festival 2026
तुळजापूर : शारदीय नवरात्र महोत्सवाच्या दुसऱ्या माळेला नंदी वाहनातून काढण्यात आलेला श्री तुळजाभवानी देवीचा पारंपरिक छबिना सोहळा.pudhari photo
Published on: 
Updated on: 

तुळजापूर : श्री तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवात दुसऱ्या माळेला हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. सोमवारी रात्री देवीची नंदी वाहनातून पारंपरिक छबिना मिरवणूक काढण्यात आली. हा नयनरम्य सोहळा डोळ्यांत साठवण्यासाठी भाविकांची अथांग उपस्थिती लाभली होती.

महोत्सवानिमित्त मंदिर परिसरात करण्यात आलेली आकर्षक विद्युत रोषणाई; तसेच विविधरंगी फुलांची आकर्षक सजावट यामुळे संपूर्ण परिसराला दिव्य आणि देखणे स्वरूप प्राप्त झाले आहे.

Tuljapur Navratri Festival 2026
Sahil Wakode Case: साहिल वाकोडे प्रकरणी निष्पक्ष चौकशीची मागणी; पुन्हा ‘चलो आयआयटी’ आंदोलनाची हाक

ज्येष्ठ भाविकांना त्रासाचा सामना

दरम्यान, प्रशासनाकडून बिडकर तलावाच्या पायऱ्यांजवळून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येत आहे. मात्र, या नियोजनामुळे ज्येष्ठ भाविकांना चालताना व रांगेत उभे राहताना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसून आले. या ठिकाणी प्रशासनाने योग्य व्यवस्था करण्याची मागणी होत आहे.

या सोहळ्याप्रसंगी तहसीलदार अरविंद बोळंगे, तहसीलदार तथा व्यवस्थापक माया माने, सहायक व्यवस्थापक अनुप ढमाले, महंत तुकोजीबुवा, महंत वाकोजीबुवा, पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपिन शिंदे यांच्यासह मंदिर संस्थानचे कर्मचारी, पुजारी, सेवेकरी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuljapur Navratri Festival 2026
Caste Verification Certificate: जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी कार्यालयाच्या फेऱ्या थांबणार; नवी पेपरलेस प्रणाली सुरू होणार

अशी झाली सजावट

नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्री तुळजाभवानी मंदिर गाभारा, मुख्य प्रवेशद्वार आणि संपूर्ण परिसर फुलांच्या माळा व रंगीबेरंगी विद्युत रोषणाईने उजळून निघाला आहे. हा रोषणाईचा सोहळा भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news