Dharashiv News : दुष्काळाच्या झळांत झेंडू फुलवतोय बळीराजाच्या आशेचा सुगंध !

ईट परिसरात दसऱ्याच्या मुहूर्तावर चांगल्या बाजारभावाची शेतकऱ्याला अपेक्षा
Dharashiv News
Dharashiv News : दुष्काळाच्या झळांत झेंडू फुलवतोय बळीराजाच्या आशेचा सुगंध !file photo
Published on: 
Updated on: 

Farmers in the It area expect good market prices on the occasion of Dussehra

समाधान डोके

ईटः यंदा पावसाच्या लहरीपणामुळे खरीप हंगामातील सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले पीक हिरावल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. मात्र, या दुष्काळी परिस्थितीतही ईटसह परिसरातील शिवारात फुललेली झेंडूची शेती बळीराजाच्या आशा पल्लवित करत आहे. पिवळ्या आणि केशरी रंगांच्या फुलांनी बहरलेल्या शेतांमुळे परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, दसऱ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा आहे.

Dharashiv News
Tulja Bhavani : तुळजाभवानी देवीची देखणी रथ अलंकार महापूजा

ईटसह वडाचीवाडी, उमाचीवाडी, आंदुड, गिरवली आणि डोकेवाडी परिसरातील शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केली आहे. यंदा पावसाने ओढ दिल्याने पिकांच्या वाढीवर परिणाम झाला. ऐन काढणीच्या काळात झालेल्या नुकसानीमुळे सोयाबीनमधून उत्पादन खर्चही निघणे कठीण झाले आहे.

अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून आणि उधारीवर शेतीची मशागत करून खरीप पिके घेतली होती. त्यामुळे आर्थिक अडचणी अधिकच वाढल्या आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत कमी कालावधीत उत्पन्न देणाऱ्या झेंडूच्या पिकाने शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. दसरा आणि नवरात्रोत्सवात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते.

Dharashiv News
Dharashiv News : धाराशिवचा कचरा डेपो हटवा; अन्यथा आंदोलन !

पूजाविधी, तोरणे आणि सजावटीसाठी या फुलांचा वापर केला जातो. त्यामुळे सणासुदीच्या काळात बाजारात चांगला भाव मिळाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागण्याची शक्यता आहे. दुष्काळाच्या झळा सोसत असतानाही शेतकऱ्यांनी जिद्द आणि नियोजनाच्या बळावर फुलवलेली ही शेती आशेचा नवा किरण ठरत आहे. आता उत्पादनाला अपेक्षित बाजारभाव मिळतो का, यावर शेतकऱ्यांच्या मेहनतीचे आर्थिक यश अवलंबून राहणार आहे

फुलांच्या दरावर गणित !

सोयाबीनच्या नुकसानीने आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी झेंडूचे पीक महत्त्वाचा आधार ठरू शकते. दसऱ्याच्या काळात फुलांना असलेल्या मागणीचा फायदा शेतकऱ्यांना मिळणे आवश्यक आहे. वाहतूक खर्च आणि उत्पादन खर्च वजा जाता योग्य दर मिळाल्यास बळीराजाला काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळेल. दुष्काळाच्या सावटात फुललेल्या या झेंडूच्या फुलांकडे आता शेतकऱ्यांच्या आशा लागल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news