Dharashiv Crime | गोमांस तस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई; २७ लाखांचा मुद्देमाल जप्त

परंडा येथून लातूरच्या दिशेने जाणाऱ्या दोन पिकअप वाहनांमधून गोमांसची वाहतूक
Vashi  Smuggling
एका आयशर टेम्पोमधून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या १३ जर्सी गायी जप्त करण्यात आल्या. Pudhari
Published on: 
Updated on: 

Vashi Smuggling

वाशी : गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांसाची वाहतूक करणाऱ्या टोळीविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई केली. परंडा येथून लातूरच्या दिशेने जाणाऱ्या दोन पिकअप वाहनांमधून गोमांस, तर एका आयशर टेम्पोमधून कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या १३ जर्सी गायी जप्त करण्यात आल्या. या कारवाईत एकूण २७ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, १३ गायींना जीवदान मिळाले.

पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक ३० सप्टेंबर रोजी पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, परंडा परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस दोन पिकअप वाहनांत भरले आहे. तसेच एका आयशर टेम्पोमधून जर्सी गायी कत्तलीसाठी लातूरच्या दिशेने नेण्यात येत आहेत. ही वाहने भूम, पारडी, येरमाळा मार्गे लातूरकडे जाणार असल्याची माहिती मिळाली.

Vashi  Smuggling
Dharashiv drought situation: पिके करपली; तातडीने मदतीची गरज

मिळालेली माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना देण्यात आली. त्यानंतर पथकाने वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील इंदापूर शिवारात महामार्गालगत सापळा रचला. काही वेळातच माहितीतील दोन पिकअप आणि एक आयशर टेम्पो तेथे येताच पोलिसांनी शिताफीने तिन्ही वाहने थांबवून तपासणी केली.

तपासणीदरम्यान दोन्ही पिकअप वाहनांमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करून त्यांचे मांस भरल्याचे आढळून आले. तर आयशर टेम्पोमध्ये १३ जर्सी गायी दाटीवाटीने बांधून, त्यांच्या चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता कत्तलीसाठी नेल्या जात असल्याचे निदर्शनास आले.

Vashi  Smuggling
Dharashiv News : ‘लबाडांचे आवतन’ म्हणत उबाठा शिवसेनेकडून दुष्काळी जीआरची होळी

पोलिसांनी दोन्ही पिकअप, आयशर टेम्पो तसेच संबंधित इसमांना वाशी पोलीस ठाण्यात आणले. या कारवाईत एकूण २७ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, चालक पोलीस हवालदार महेबुब अरब, सुभाष चौरे आणि प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news