Dharashiv Crime | तलमोड शिवारात ७५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ

सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलमोड शिवारात वन विभागाच्या तपासणी नाक्याजवळ अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला
 body found
प्रातिनिधिक छायाचित्र(File Photo)
Published on
Updated on

Umarga Taluka Body Found

उमरगा : उमरगा तालुक्यातील सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावरील तलमोड शिवारात वन विभागाच्या तपासणी नाक्याजवळ एका अंदाजे ७५ वर्षीय अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना शनिवारी (दि. ११) दुपारी सुमारे १ ते १.३० वाजण्याच्या दरम्यान उघडकीस आली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तलमोड शिवारातील वन विभागाच्या चेकपोस्टलगत जाणाऱ्या कच्च्या रस्त्याच्या बाजूला वडाच्या झाडाखाली गुलाबी रंगाच्या चटईवर एका वृद्धाचा मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक वाजिद शेख, चैतन्य कोनगुलवार, पोलीस शिपाई श्रीहरी फुगटे यांच्यासह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.

 body found
Dharashiv News : उत्तर प्रदेशातील गँगस्टरची उमरग्यातील दाळ मिल सील

पोलिसांनी परिसराची कसून पाहणी करून मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, वृत्त लिहिपर्यंत त्याची ओळख पटलेली नव्हती.

मृत व्यक्तीचे अंदाजे वय ७५ वर्षे असून, मध्यम बांधा, उंची सुमारे १६८ सेंटीमीटर, उभट चेहरा, सावळा वर्ण, पांढरी दाढी अशी त्याची शारीरिक वैशिष्ट्ये आहेत. अंगात पांढऱ्या रंगाचा नेहरू शर्ट व पायजमा, पायात नवीन चप्पल असून मृतदेहाशेजारी नवीन ब्लँकेट आढळून आले.

 body found
Dharashiv News : माणकेश्वर येथे पशुपालकांना मका वैरण बियाण्यांचे वाटप

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला असून, त्यानंतर तो शवागारात ठेवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक वाजिद शेख करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news