Dharashiv News : उत्तर प्रदेशातील गँगस्टरची उमरग्यातील दाळ मिल सील

गुन्हेगारी साम्राज्यावर टाच : भदोही प्रशासनाची महाराष्ट्रात धडक कारवाई
crime News
Dharashiv News : उत्तर प्रदेशातील गँगस्टरची उमरग्यातील दाळ मिल सीलCrime File Photo
Published on
Updated on

Uttar Pradesh gangster's dal mill in Umargya sealed

उमरगा, पुढारी वृत्तसेवा : उत्तर प्रदेशातील कुप्रसिद्ध गँगलीडर विजय मिश्रा याच्या कथित गुन्हेगारी साम्राज्यावर उत्तर प्रदेश प्रशासनाने मोठा घाव घालत महाराष्ट्रातील उमरगा तालुक्यातील जकेकुर (जि. धाराशिव) येथील तब्बल २० ते २५ कोटी रुपयांच्या दाल मिलवर जप्ती (कुर्क) ची धडक कारवाई केली. गुन्हेगारीच्या पैशातून उभारण्यात आलेल्या १०० कोटी २५ लाख रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई सुरू होताच उमरगा औद्योगिक वसाहतीत एकच खळबळ उडाली असून, अवैध मार्गाने संपत्ती उभी करणाऱ्यांचे धाबे दणाणल्याची चर्चा रंगली आहे.

crime News
Dharashiv Crime : यूपी पोलिसांची उमरग्यात मोठी कारवाई; गँगस्टरची २५ कोटींची मालमत्ता सील

उत्तर प्रदेशातील भदोही जिल्ह्याच्या जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांनी २ जुलै २०२६ रोजी दिलेल्या आदेशानुसार यूपी गँगस्टर अॅक्टच्या कलम १४ (१) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार मंगळवारी, (दि ०७) उमरगा लातूर रोड वरील जकेकुर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक बी-१०२ वरील 'लल्ली अॅग्रो इंडस्ट्रीज एलएलपी' या पल्स (दाल) मिलच्या मुख्य प्रवेशद्वारावर प्रशासनाने अधिकृत जप्तीचा फलक लावला.

चौकशीत विजय मिश्रा याने कथित गुन्हेगारी उत्पन्नातून ही मालमत्ता आपला जावई मुकेश तिवारी व मुलगी गरीमा तिवारी (रा. विलेपार्ले, मुंबई) यांच्या नावावर खरेदी केल्याचे नमूद करण्यात आले आहे. सुमारे ५ हजार ५० चौरस मीटर क्षेत्रावरील या प्रकल्पाची किंमत २० ते २५ कोटी रुपयांच्या घरात असल्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशातील कारवाईचा थेट फटका महाराष्ट्रातील उद्योगाला बसल्याने या घटनेची चर्चा सुरू झाली आहे. उमरगा औद्योगिक वसाहतीतही या कारवाईनंतर संशयास्पद गुंतवणुकीकडे पुन्हा लक्ष वेधले जात असून, कायद्याचा फास आणखी घट्ट होण्याचे संकेत मिळत आहेत.

crime News
Drone monitoring during elections : मतदान केंद्र,परिसरावर ड्रोनची नजर

भदोही जिल्ह्याच्या जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांनी २ जुलै २०२६ रोजी यूपी गँगस्टर अॅक्टच्या कलम १४ (१) अंतर्गत अशा मालमत्तांवर जप्ती (कुर्क) ची कारवाई करण्याचे आदेश दिले. या आदेशानुसार उत्तर प्रदेशासह महाराष्ट्रातील मालमत्तांवरही जप्तीची प्रक्रिया राबविण्यात येत आहे, उमरगा तालुक्यातील जकेकुर चौरस्ता येथील दाल मिलचा त्यात समावेश आहे.

'कुर्क' म्हणजे काय ?

'कुर्क' म्हणजे न्यायालय किंवा सक्षम प्राधिकाऱ्याच्या आदेशानुसार संबंधित मालमत्तेवर शासनाचा ताबा प्रस्थापित करणे. अशा मालमत्तेची विक्री, हस्तांतरण किंवा व्यवहार करता येत नाही. संबंधित व्यक्तीचा त्या मालमत्तेवरील ताबा आणि व्यवहाराचे अधिकार कायदेशीररीत्या मर्यादित केले जातात.

उत्तर प्रदेशातील भदोही जिल्हा मॅजिस्ट्रेट यांनी संबंधित आरोपी विरुद्ध 'गुंडा अॅक्ट' अंतर्गत दिलेल्या आदेशानुसार लातूर रोडवरील जकेकुर चौरस्ता एमआयडीसी परिसरातील मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात आली. उत्तर प्रदेश पोलीस, स्थानिक महसूल प्रशासन आणि उमरगा पोलीस पथकाने संयुक्तपणे कायदेशीर प्रक्रियेसह शांततेत आणि नियमानुसार कारवाई पार पाडली.
- प्रल्हाद सुर्यवंशी, पोलिस निरीक्षक उमरगा

गँगस्टर विजय मिश्रा कोण ?

उत्तर प्रदेशातील गोपीगंज पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १०९/२०२२ अंतर्गत हे प्रकरण नोंद आहे. या गुन्ह्यात गँगलीडर विजय रामदेव मिश्रा (रा. खपटिहा, जि. प्रयागराज) याच्याविरुद्ध 'उत्तर प्रदेश गँगस्टर आणि समाजविघातक कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम' (यूपी गँगस्टर अॅक्ट) च्या कलम ३ (१) अन्वये कारवाई सुरू आहे. तपासादरम्यान विजय मिश्रा याने कथित गुन्हेगारी कारवाया आणि बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर संपत्ती उभारल्याचा आरोप आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news