

Dharashiv News : Distribution of Maize Varana seeds to cattle rearers in Mankeshwar
भूम, पुढारी वृत्तसेवा : पशुवैद्यकीय चिकित्सालय माणकेश्वर अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना २०२६-२७अंतर्गत शंभर टक्के अनुदानावर मका वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले. या योजनेंतर्गत माणकेश्वर परिसरातील १५९ पात्र पशुपालकांना बियाण्यांचे वितरण करून लाभ देण्यात आला.
या योजनेसाठी एकूण २३३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी १५९ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. माणकेश्वर, तांबेवाडी, देवळाली, वांगी (बु.), सावरगाव, दरेवाडी व देवांग्रा येथील पशुपालकांना जनावरांसाठी दर्जेदार चारा उपलब्ध व्हावा, या उद्देशाने मका वैरण बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
बियाणे वितरण कार्यक्रमास जिल्हा परिषद सदस्या साधनाताई बापूसाहेब अंधारे यांचे पुत्र किशोर अंधारे, पंचायत समिती सदस्य मनोज अंधारे, ग्रामपंचायत उपसरपंच विशाल अंधारे, पशुधन विकास अधिकारी डॉ. सुरजकुमार गुळमेरे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. रामचंद्र खताळ, कुरुंद, डॉ. समाधान अंधारे, ग्रामपंचायत सदस्य कल्याण देवकते, वांगी ग्रामपंचायत सदस्य बालाजी शेळके यांच्यासह राहुल गुंजाळ, अशोक अंधारे, अर्जुन बनगर, राजाभाऊ अंधारे, अविनाश भराटे, काकासाहेब अंधारे, अंकुश बनगर, सोहेल मोहजर, बळीराम लहाने, आबासाहेब यादव, प्रशांत दोपारे, राजाभाऊ लोंढे, बाबासाहेब गिलबिले आणि परिसरातील अनेक पशुपालक उपस्थित होते.