Dharashiv MLC Election : मतदारांचे होताहेत ‘रिसॉर्ट’वर लाड, मद्यप्रेमींसाठी ‘ड्राय डे’चा कोरडा आड!

धाराशिव जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीतील गमतीदार चित्र
Dharashiv MLC Election
Dharashiv MLC Electionpudhari photo
Published on
Updated on

भीमाशंकर वाघमारे

धाराशिव : अटीतटीच्या निवडणुकांत मतांची किमतही काही हजारांच्या घरात पोहोचल्याचे आपण पाहत असतो. त्यातच विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक असेल तर... मताचा दर विचारायची सोयच नाही. अशातच एक घडामोड सध्‍या चर्चेत आहे. या निवडणुकीसाठीचे अनेक मतदार सध्‍या गोवा, कोकण सहलीवर असून त्‍यांची शाही बडदास्‍त चर्चेत आहे तर इकडे जिल्‍ह्यात मात्र सामान्‍य मद्यप्रेमींना मात्र ‘ड्राय डे’चा डोस सहन करावा लागत आहे.

सध्या उस्मानाबाद–लातूर–बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक रंगात आली असून भाजप व काँग्रेस यांच्यात थेट सामना होत आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी मतदार सुरक्षित जेवण्याची रणनीती आखली जात असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहेत. काही मतदार कोकण, लोणावळा व गोवा येथे ‘सहल’ अनुभवत असल्याचे बोलले जात असून त्यांची सर्व व्यवस्था, पाहुणचार आणि सोयी यांची विशेष काळजी घेतली जात असल्याचेही चर्चेत आहे.

Dharashiv MLC Election
'कृष्णा'ची निवडणूक १४ मे पूर्वी केव्हाही

हेच मतदार आता मतदानाच्या दिवशी कडेकोट बंदोबस्तात जिल्ह्यात परतणार असल्याचे सांगितले जाते. जिल्‍ह्यातील अवघ्या ३१७ मतदारांच्या या निवडणुकीत प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले जात असल्याने संपूर्ण प्रक्रियेला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे.दरम्यान, प्रशासनाने आचारसंहितेचा भाग म्हणून १६ जूनच्या सायंकाळी ४ वाजल्यापासून १८ जूनपर्यंत नागरी क्षेत्रात मद्यविक्रीवर बंदी लागू केली आहे.

त्यामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांना विशेषत: मद्यप्रेमींना ‘ड्राय डे’चा अनुभव घ्यावा लागत असताना, निवडणूक प्रक्रियेच्या केंद्रस्थानी असलेली मंडळी मात्र वेगळ्याच व्यवस्थेत असल्याचे चित्र चर्चेत आहे.एका बाजूला काहीशे मतदारांच्या निवडणुकीसाठी कडेकोट बंदोबस्त, सहली आणि विशेष व्यवस्था; तर दुसऱ्या बाजूला शहरात लागू झालेली मद्यविक्री बंदी. या दोन्ही गोष्टींमधील विरोधाभासच सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे. नागरिकही यावर खुमासदार चर्चा करताना दिसत आहेत.

Dharashiv MLC Election
Supreme Court | अपप्रचार पुरे आता...

जिल्‍हानिहाय असे आहेत मतदार

या निवडणुकीत जिल्‍हा परिषद सदस्‍य तसेच नगरपालिका, नगर पंचायतीचे सदस्‍य मतदार असतात. त्‍यानुसार धाराशिव जिल्‍ह्यातून ३१७, लातूर जिल्‍ह्यातून ३६७ आणि बीड जिल्‍ह्यातून नगरपालिका, नगर पंचायतींचे ३०४ असे एकूण ९८८ मतदार हक्‍क बजावतील. बीड जिल्‍हा परिषद निवडणूक अद्याप प्रलंबित आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news