Illegal Opium Farming | कळंब तालुक्यात अफूची बेकायदेशीर लागवड; साडेचार किलो पीक जप्त

Dharashiv News | कळंब तालुक्यातील पानगाव शिवारात पोलिसांचा छापा
Opium Seized Kalamb Taluka
Opium Seized Kalamb TalukaPudhari
Published on
Updated on

Opium Seized Kalamb Taluka

रत्नापूर : कळंब तालुक्यातील पानगाव शिवारात अफूची अवैध लागवड केल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. येरमाळा पोलीस ठाणे यांच्या पथकाने छापा टाकून सुमारे साडेचार किलो वजनाचे अफूचे पीक जप्त केले. जप्त मालाची अंदाजे बाजार किंमत १ लाख ४१ हजार १५० रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यापूर्वी वाशी तालुक्यातील दसमेगाव तसेच कळंब तालुक्यातील कनेरवाडी येथेही अशाच प्रकारच्या घटना उघड झाल्यानंतर तालुक्यात अवैध अंमली पदार्थांच्या लागवडीविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्याच अनुषंगाने येरमाळा परिसरालगत असलेल्या पानगाव शिवारातील गट क्रमांक १४१/४ मधील शेतात अफूची शेती सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.

Opium Seized Kalamb Taluka
धाराशिव जिल्ह्यात भाजपचे निर्विवाद वर्चस्व

उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि तात्याराव भालेराव व त्यांच्या पथकाने संबंधित ठिकाणी भेट देत तपासणी केली. पाहणीदरम्यान पानगाव येथील बाबासाहेब वाघमारे यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात अफूची झाडे आढळून आली.

घटनास्थळी पंचनामा करून संपूर्ण कारवाईची व्हिडिओग्राफी करण्यात आली. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून अफूचे पीक जप्त करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू असून पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.

Opium Seized Kalamb Taluka
Dharashiv News : सहा महिन्यांत शहरातील कचरा डेपो हलवणार

तालुक्यातील शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारची बेकायदेशीर लागवड करू नये; अन्यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे. कारवाईदरम्यान पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल भोजगुडे, उपनिरीक्षक आवारे, तानाजी काळे, कॉन्स्टेबल किरण शिंदे, रवींद्र कांबळे, निलेश जाधव आदी कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news