Dharashiv Car Accident | हैदराबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात; मुरूममधील दाम्पत्याचा मृत्यू

स्विफ्ट कारची समोरील वाहनाला पाठीमागून जोरदार धडक; एक जण जखमी, मुदकना कुटुंबावर दुःखाचा डोंगर
 Accident  News
Accident Newsfile photo
Published on: 
Updated on: 

Dharashiv Hyderabad Highway Accident

मुरूम : हैदराबाद येथून मुरूमकडे परतत असताना झालेल्या भीषण अपघातात मुरूम येथील दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर अन्य एक जण जखमी झाला. झहीराबाद बाह्यवळण राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर मंगळवारी (दि. २४) सकाळी हा अपघात घडला. कारने समोरील वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे मुदकना कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मुरूम शहरात शोककळा पसरली आहे.

मुरूम येथील महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष तथा शांतिनिकेतन शाळेचे अध्यक्ष शरणाप्पा सिद्रामप्पा मुदकना (वय ५५) हे आपला मुलगा विरेंद्र याला हैदराबाद विमानतळावर सोडण्यासाठी पत्नी सुषमा (वय ५१) यांच्यासह गेले होते. विरेंद्र हा नेपाळ येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. मुलाला विमानतळावर सोडल्यानंतर शरणाप्पा आणि सुषमा हे कारने मुरूमकडे परतत होते.

 Accident  News
Dharashiv News : भूम, परंडा शिवारात भीषण आग; २ कोटींचा ऊस जळून खाक !

दरम्यान, झहीराबादजवळील बाह्यवळण महामार्गावर त्यांच्या कारने समोरील वाहनाला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारमध्ये पुढील बाजूस बसलेले शरणाप्पा आणि त्यांच्या पत्नी सुषमा यांचा मृत्यू झाला. तर कारमध्ये मागील बाजूस बसलेले अजीम शेख (वय ३०, रा. कोथळी, ता. उमरगा) हे जखमी झाले.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. जखमी अजीम शेख यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

 Accident  News
Dharashiv News : येडशीमध्ये घराला आग, एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू

मृत शरणाप्पा मुदकना हे शिंदे सेनेचे उमरगा तालुका उपप्रमुख चंद्रशेखर मुदकना यांचे लहान बंधू होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात परिचित असलेल्या मुदकना कुटुंबातील पती-पत्नीचा एकाच अपघातात मृत्यू झाल्याची बातमी समजताच मुरूम शहरासह परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.