Omprakash Rajenimbalkar : पाणीटंचाई, रखडलेली कामे मार्गी लावा

दिशा समितीच्‍या बैठकीत खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकरांची सूचना
Dharashiv Development Works
दिशा समितीच्‍या बैठकीला उपस्‍थित खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आ. कैलास पाटील, जिल्‍हाधिकारी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी pudhari photo
Published on: 
Updated on: 

धाराशिव: जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, पाणीटंचाई आणि रखडलेल्या विकासकामांवर तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रशासनाला दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सनियंत्रण व समन्वय (दिशा) समितीची बैठक झाली. यावेळी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलजीवन मिशनची अपूर्ण कामे, शहरी व ग्रामीण पाणीपुरवठा योजना, धाराशिव शहरातील रखडलेली उद्यान विकासकामे आणि रस्त्यांची दुरुस्ती या प्रश्नांवर चर्चा झाली. तसेच शेतकऱ्यांचे पीकविमा व कृषी अनुदानाचे प्रश्न, कृषीपंपांचा वीजपुरवठा, ग्रामीण आरोग्य सेवा, शाळांमधील सुविधांचा अभाव, प्रधानमंत्री आवास योजना आणि मनरेगाच्या कामांचा आढावा घेण्यात आला. महिला व बालकल्याण, स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापनाच्या मुद्द्यांकडेही लक्ष वेधण्यात आले.

Dharashiv Development Works
Beed News : टाकरवनचा सुपुत्र जपानमध्ये करणार आंतरराष्ट्रीय संशोधन!

विभागनिहाय विकासकामांची सद्यस्थिती, निधीची उपलब्धता आणि प्रलंबित प्रकल्पांची माहिती घेण्यात आली. मंजुरी मिळूनही रखडलेली कामे आणि नागरिकांच्या तक्रारींचा प्राधान्याने निपटारा करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली. पिण्याचे पाणी, रस्ते, आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत सुविधा नागरिकांना वेळेत मिळाल्या पाहिजेत.

केवळ बैठका आणि आढाव्यापुरते मर्यादित न राहता प्रलंबित प्रश्नांवर ठोस कार्यवाही करावी. सर्व विभागांनी समन्वयाने काम करून विकासकामांना गती द्यावी आणि शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवावा, अशा सूचना खासदार राजेनिंबाळकर यांनी दिल्या. जिल्ह्याच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Dharashiv Development Works
Chhatrapati Sambhajinagar News : कन्नड तालुक्यात दुष्काळाचा यंदा रब्बी हंगामाला फटका

‘सीओं’सह नगर पालिकेला सुनावले

नमो उद्यानावरुन खा. ओमराजेंनी या वेळी धाराशिव पालिकेची झाडाझडती घेतली. या कामाबाबत समाधानकारक उत्तर देता न आल्‍याने त्‍यांनी मुख्‍याधिकारी नीता अंधारे यांना खडसावले. तर याबाबत जे दोषी असतील त्‍यांच्‍या कारवाईची सूचनाही जिल्‍हाधिकारी किर्तीकिरण पुजार यांना केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.