Beed News : टाकरवनचा सुपुत्र जपानमध्ये करणार आंतरराष्ट्रीय संशोधन!

डॉ. मतीन पटेल यांची शिन्शू विद्यापीठात निवड; पोटॅशियम-आयन बॅटरी तंत्रज्ञानावर करणार संशोधन
International Research Opportunity
Dr.Mateen Patelpudhari photo
Published on: 
Updated on: 

टाकरवन : ग्रामीण भागात प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत जिद्द, चिकाटी आणि ज्ञानाच्या जोरावर यशाचे शिखर गाठता येते, हे माजलगाव तालुक्यातील टाकरवनचे सुपुत्र डॉ. मतीन गणी पटेल यांनी सिद्ध करून दाखवले आहे. जपानमधील प्रतिष्ठित शिन्शू विद्यापीठात आंतरराष्ट्रीय संशोधनासाठी त्यांची निवड झाली असून, आधुनिक तंत्रज्ञानाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पोटॅशियम-आयन बॅटरीवर ते संशोधन करणार आहेत. त्यांच्या या निवडीमुळे टाकरवनसह बीड जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोबाईल, लॅपटॉप आणि इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर लिथियम-आयन बॅटरीचा वापर केला जातो. मात्र, या बॅटरीला अधिक स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक पर्याय शोधण्याचे आव्हान जगासमोर आहे. या पार्श्वभूमीवर पोटॅशियम-आयन बॅटरी तंत्रज्ञानाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. याच विषयावर डॉ. मतीन पटेल जपानमध्ये सखोल संशोधन करणार आहेत. त्यांच्या संशोधनातून भविष्यात ऊर्जा साठवणूक क्षेत्रात नवे पर्याय उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे. त्याचा फायदा इलेक्ट्रिक वाहने आणि विविध इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या निर्मिती क्षेत्राला होऊ शकतो.

International Research Opportunity
Jalna Dam Water Storage : जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पातील पाणी साठ्याची स्थिती चिंताजनक

जपान सरकारच्या 'इंडिया-जपान सर्क्युलेशन ऑफ टॅलेंटेड युथ्स इन सायन्स' या विशेष उपक्रमांतर्गत त्यांची निवड करण्यात आली आहे. या संशोधनासाठी जपानमधील वास्तव्यात त्यांना सरकारकडून विद्यावेतन तसेच संशोधनासाठी स्वतंत्र निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या संधीमुळे त्यांच्या संशोधन प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे.टाकरवनसारख्या ग्रामीण भागातून सुरू झालेला त्यांचा प्रवास छत्रपती संभाजीनगरपर्यंत पोहोचला.

तेथे उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी संशोधन क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली. आई-वडिलांचे संस्कार, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या बळावर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील ही संधी मिळवली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही जागतिक स्तरावर संशोधन करण्याची क्षमता आहे, हे त्यांच्या यशाने अधोरेखित केले आहे.

International Research Opportunity
Chhatrapati Sambhajinagar News : कन्नड तालुक्यात दुष्काळाचा यंदा रब्बी हंगामाला फटका

गावच्या शिरपेचात मानाचा तुरा

डॉ. मतीन पटेल यांच्या निवडीची बातमी समजताच टाकरवन गावात आनंद व्यक्त करण्यात येत आहे. गावचे माजी सरपंच वसीम पटेल यांनी त्यांच्या यशाचे कौतुक केले. विज्ञानाला जात, धर्म किंवा भौगोलिक सीमांचे बंधन नसते. ज्ञान, गुणवत्ता आणि प्रामाणिक कष्ट यांच्या जोरावर जागतिक स्तरावर स्थान मिळवता येते, हे मतीन पटेल यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या निवडीमुळे टाकरवन गावाची ओळख आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.डॉ. मतीन पटेल यांच्या या यशाबद्दल टाकरवन, माजलगाव सह बीड जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.