Dharashiv crime आंदोरा येथे गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई

गझडती घेतली असता त्याच्या कंबरेला खोचलेला एक गावठी कट्टा आणि पँटच्या खिशात दोन जिवंत काडतुसे आढळून आली
Dharashiv crime आंदोरा येथे गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
Published on
Updated on

रत्नापूर : धाराशिव जिल्ह्यातील बेकायदेशीर शस्त्रधारकांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने पुन्हा एकदा धडाकेबाज कारवाई करत एका तरुणाला गावठी कट्टा व दोन जिवंत काडतुसांसह ताब्यात घेतले आहे. पोलीस अधीक्षक रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार यांनी बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम सुरू केली आहे.

Dharashiv crime आंदोरा येथे गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
Washim Crime : वाशिममध्ये अवैध दारू अड्ड्यांवर पोलिसांची धडक कारवाई; जिल्ह्यातून ६ लाखांहून अधिकचा साठा जप्त

येरमाळा चौक परिसरात पथक गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली की, शाम शिवाजी काळे (वय ३२, रा. झगडे गल्ली, भूम) हा आंदोरा येथे पंचायतच्या कामासाठी आला असून हॉटेल निसर्गसमोर थांबलेला आहे. त्याच्याकडे गावठी कट्टा असल्याची खात्रीशीर माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पथकाने तात्काळ सापळा रचून घटनास्थळी धाव घेतली. संशयित इसम दिसताच पोलिसांनी त्याला शिताफीने पकडून ताब्यात घेतले. अंगझडती घेतली असता त्याच्या कंबरेला खोचलेला एक गावठी कट्टा आणि पँटच्या खिशात दोन जिवंत काडतुसे आढळून आली.

Dharashiv crime आंदोरा येथे गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
Nanded Crime : पिस्टलसह 4 जिवंत काडतुसे जप्त, दोघांना अटक

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत सुमारे ४६ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. आरोपीची वैद्यकीय तपासणी करून त्याच्याविरुद्ध कळंब पोलीस ठाण्यात बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्ज पवार यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, रोहित दंडनाईक आदींच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली. धाराशिव जिल्ह्यात बेकायदेशीर शस्त्रधारकांविरोधातील मोहिमेला आणखी वेग देण्यात येणार असल्याचे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे.

Dharashiv crime आंदोरा येथे गावठी कट्ट्यासह तरुण जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई
Washim Crime : मंगरुळपीर हादरले! १९ लाखांचा गांजा जप्त; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news