Dharashiv crime: वाशीत दरोड्याचा कट उधळला: ७ ते ८ संशयितांचा थरारक पाठलाग; वाहनासह लाखांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यात कोयते, कटर, सुरी, मिरची पावडर आणि दरोड्याचे इतर साहित्य सापडले
Dharashiv crime: वाशीत दरोड्याचा कट उधळला: ७ ते ८ संशयितांचा थरारक पाठलाग; वाहनासह लाखांचा मुद्देमाल जप्त
Published on
Updated on

वाशी : पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या ७ ते ८ संशयितांचा पोलिसांनी थरारक पाठलाग केला. या कारवाईदरम्यान संशयितांनी केलेल्या दगडफेकीत शासकीय वाहनाचे नुकसान झाले, मात्र पोलिसांच्या प्रसंगाहोधानामुळे दरोड्याचा मोठा कट उधळण्यात आला. घटनास्थळावरून टाटा सुमो वाहन आणि दरोड्याचे साहित्य असा एकूण सुमारे ५,००,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस ठाणे वाशी हद्दीत १ रोजी रात्री राष्ट्रीय महामार्गावर पोलीस पथक नियमित गस्त घालत होते. त्यावेळी येरमाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक यशवंत घोडके यांनी, नांदगाव मार्गे बोरी पाटीकडे जाणाऱ्या टाटा सुमोमधील (क्र. MH-25 AT-0656) ७ ते ८ संशयित इसम दरोड्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती वाशी पोलीस ठाण्यातील चालक पोलीस कॉन्स्टेबल पवार व पोलीस कॉन्स्टेबल साठे यांना दिली.

Dharashiv crime: वाशीत दरोड्याचा कट उधळला: ७ ते ८ संशयितांचा थरारक पाठलाग; वाहनासह लाखांचा मुद्देमाल जप्त
Dharashiv Crime | डिकसळ येथे गोवा निर्मित प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त!

पोलिसांचा पाठलाग व दगडफेक; सशस्त्र साहित्य जप्त

माहिती मिळताच पोलीस पथकाने संशयित वाहनाचा शोध सुरू केला. सदर वाहन दिसल्यानंतर पोलिसांनी ते थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु चालकाने न थांबता वाहन भरधाव वेगाने पळवून नेले. पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवला असता, संशयितांनी चकवा देण्यासाठी शासकीय वाहनावर दगडफेक केली, ज्यामुळे शासकीय वाहनाचे नुकसान झाले. तरीही न घाबरता पोलिसांनी धाडस दाखवले. काही अंतरावर संशयितांनी वाहन अंधाराचा फायदा घेऊन सोडून दिले आणि पळ काढला. पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता त्यात कोयते, कटर, सुरी, मिरची पावडर आणि दरोड्याचे इतर साहित्य सापडले.

Dharashiv crime: वाशीत दरोड्याचा कट उधळला: ७ ते ८ संशयितांचा थरारक पाठलाग; वाहनासह लाखांचा मुद्देमाल जप्त
Dharashiv crime | कळंब येथे प्रभात लॉजवर छापा : तिघांवर गुन्हा दाखल, दोन महिलांची सुटका

कायदेशीर कारवाई व तपास

याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३१०(४), ३१०(५), १२१(१) व ३२४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपींचा शोध तीव्र करण्यात आला आहे. पोलीस पथकाची उल्लेखनीय कामगिरी: ही यशस्वी कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सौ. रितू खोकर, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले यांच्या मार्गदर्शनाखाली येरमाळा, कळंब व वाशी पोलीस ठाण्याच्या पथकातील अधिकारी व अंमलदारांनी पार पाडली. गुन्ह्याचा पुढील तपास वाशी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर शिंदे करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news