Dharashiv Crime | डिकसळ येथे गोवा निर्मित प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त!

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; सुमारे ₹7.89 लाखांचा मुद्देमाल हस्तग
Dharashiv Crime | डिकसळ येथे गोवा निर्मित प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त!
Dharashiv Crime | डिकसळ येथे गोवा निर्मित प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त!
Published on
Updated on

रत्नापूर : राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळंब तालुक्यातील डिकसळ येथे धाड टाकून गोवा राज्यातून महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे आणण्यात आलेल्या प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त केला. या कारवाईत मद्यसाठा, चारचाकी वाहन आणि इतर साहित्य असा एकूण ₹7 लाख 89 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, एका आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आयुक्त राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य डॉ. राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार तसेच संचालक (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे आणि विभागीय उपआयुक्त संगीता दरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली धाराशिव जिल्ह्यात अवैध मद्याची आयात, वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम सुरू आहे.

Dharashiv Crime | डिकसळ येथे गोवा निर्मित प्रतिबंधित विदेशी मद्याचा मोठा साठा जप्त!
Dharashiv crime | कळंब येथे प्रभात लॉजवर छापा : तिघांवर गुन्हा दाखल, दोन महिलांची सुटका

या मोहिमेदरम्यान ३१ जुलै २०२६ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भूम-३ पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे रामनगर नवीन वसाहत, डिकसळ (ता. कळंब) येथील एका घरावर छापा टाकण्यात आला.

या कारवाईत विजय परशुराम कदम (वय ५०) याच्या घरातून गोवा निर्मित व महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेल्या 'रॉयल इम्पेक्ट' या विदेशी मद्याच्या ७५० मिलीच्या ५२ बॉक्समधील ६२४ सिलबंद बाटल्या, विविध कंपनींचे ४ हजार तयार बुचे तसेच मद्य वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी टाटा सुमो गोल्ड EX (क्र. MH-43/AJ-7218) जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत ₹७,८९,२०० इतकी आहे.

आरोपीने गोवा निर्मित विदेशी मद्य महाराष्ट्रात विक्रीसाठी अवैधरित्या आणून साठवून ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, १९४९ मधील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक आर. एम. बांगर, एच. बी. लांडे, दुय्यम निरीक्षक यु. व्ही. रामगुडे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक ए. बी. कोरे, आर. आर. गिरी तसेच जवान एल. ए. डोंबाळे, व्ही. ए. चव्हाण, एम. एस. गजधने, ए. ए. गवंडी आणि अनिल कोळी यांच्या पथकाने केली. पुढील तपास आर. एम. बांगर करीत आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अवैध मद्यनिर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री किंवा साठवणुकीबाबत माहिती असल्यास टोल फ्री क्रमांक १८०० ८३३ ३३३३ किंवा जवळच्या राज्य उत्पादन शुल्क कार्यालयाशी संपर्क साधावा. माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news