

उमरगा, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील बलसुर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशीनचे कॅशवॉल्ट गॅसकटरने तोडून २६ लाख ८८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. ही घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. उमरगा पोलिसात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश दत्तात्रय कानुरे (रा. उदगीर) यांनी दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले आहे की, बलसुर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मशिनचे कॅशवॉल्ट गॅस कटरने तोडले. आणि त्यातील २६ लाख ८८ हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली.
पोलिसांनी श्वान पथकाला घेऊन चोरांचा माग काढण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरांचा तपास लागला नाही. या घटनेनंतर पोलीस निरीक्षक डी. बी. पारेकर यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. उमरगा पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एन. आर. गायकवाड करीत आहेत.
हेही वाचा