सभापतीपदाचा पदभार स्वीकारताच चौगुलेंचा धडाका !

उमरगा : प्रशासनाला कडक सूचना देत १० दिवसांचे उपोषण सोडविले
Dharashiv news
सभापतीपदाचा पदभार स्वीकारताच चौगुलेंचा धडाका !file photo
Published on
Updated on

Chougule started his work with enthusiasm as soon as he took charge as the Speaker

उमरगा, पुढारी वृत्तसेवा: पंचायत समितीच्या नूतन सभापतीपदी निवड होऊन २४ तास उलटत नाहीत, तोच अॅड आकांक्षा चौगुले यांनी आपल्या कामाचा झंझावात सुरू केला आहे. केवळ खुर्चीवर न बसता थेट जनतेच्या प्रश्नांना भिडण्याची त्यांची कार्यपद्धती पहिल्याच दिवशी दिसून आली.

Dharashiv news
Dharashiv Crime | शस्त्र व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन: गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; ५.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

तालुक्यातील भगतवाडी, कोळेवाडी आणि चिरेवाडी या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या विविध समस्यांबाबत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी करूनही दखल घेतली जात नव्हती. याविरोधात बलभीम इरले व बालाजी करणुरे हे अमरण उपोषण ग्रामस्थ मागील दहा दिवसांपासून ग्रामपंचायत कार्यालया समोर आमरण नूतन सभापती अॅड. चौगुले यांनी थेट उपोषणस्थळी भेट दिली.

यावेळी त्यांनी उपोषणकर्त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि उपस्थित असलेल्या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून एका आठवड्याच्या आत अहवाल सादर करण्याचे कडक आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. नारळ पाणी देऊन उपोषण सोडवले नूतन सभापतींच्या आश्वासक भूमिकेनंतर ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

Dharashiv news
Dharashiv Crime News | पिस्तुलाचा धाक दाखवून पेट्रोलचे पैसे न देता पळणाऱ्या दोघांना बेड्या

दरम्यान पंचायत समितीच्या सभापतीपदी पदभार स्वीकारताच अँड चौगुले यांनी दाखव लेल्या तत्परतेमुळे तालुक्यात त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच दिवशी त्यांनी संबंधितांना कामे जलदगतीने मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या, त्यामुळे प्रशासनात सकारात्मक बदलाची अपेक्षा निर्माण झाली आहे. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रशासनात शिस्त आणि पारदर्शकतेची आशा !

मागील तीन वर्षांपासून पंचायत समितीत प्रशासक राज असल्याने अनेक कामे रखडली होती. साध्या कामांसाठीही नागरिकांना वारंवार कार्यालयात फेऱ्या माराव्या लागत होत्या. यामुळे सर्वसामान्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उच्चशिक्षित सभापती अँड आकांक्षा चौगुले यांच्या नेतृत्वामुळे आता प्रशासनात शिस्त आणि पारदर्शकता येईल, अशी आशा नागरिक व्यक्त करत आहेत. विकासकामांना गती मिळून नागरिकांच्या अडचणी कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news