Dharashiv Crime | शस्त्र व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन: गावठी कट्ट्यासह तरुण ताब्यात; ५.२८ लाखांचा मुद्देमाल जप्त

राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील तेरखेडा शिवारात ही कारवाई
शस्त्र व जमावबंदीचे आदेश
शस्त्र व जमावबंदीचे आदेशPudhari File Photo
Published on
Updated on

Yermala Police Gavthi Katta Seized

रत्नापूर : जिल्ह्यात लागू असलेल्या शस्त्रबंदी व जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून बेकायदेशीररीत्या गावठी कट्टा बाळगणाऱ्या एका तरुणावर येरमाळा पोलिसांनी कारवाई केली. राष्ट्रीय महामार्ग ५२ वरील तेरखेडा शिवारात ही कारवाई करण्यात आली. या वेळी गावठी कट्ट्यासह स्कॉर्पिओ वाहन असा एकूण ५ लाख २८ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

विकास कल्याण काळे (वय २३, रा. बोरी पाटी, ता. वाशी, जि. धाराशिव) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

धाराशिव जिल्ह्यात सध्या अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांचे शस्त्रबंदी व जमावबंदीचे आदेश लागू आहेत. या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि. ६ मार्च २०२६) पहाटे सुमारे ३.४५ वाजता छत्रपती संभाजीनगर–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील तेरखेडा शिवारातील सूर्या हॉटेलसमोर एक तरुण संशयास्पदरीत्या थांबलेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

शस्त्र व जमावबंदीचे आदेश
Dharashiv Crime | परंडा पोलिसांची मोठी कारवाई; २.१७ लाखांचे 'एमडी' ड्रग्ज जप्त, एकाला अटक

या माहितीच्या आधारे येरमाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासणी केली. तपासणीदरम्यान आरोपी विकास काळे याच्याकडे सुमारे २५ हजार रुपये किमतीचा बेकायदेशीर गावठी कट्टा आढळून आला. पोलिसांनी तात्काळ कट्टा जप्त करून आरोपीला ताब्यात घेतले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी एक गावठी कट्टा (अंदाजे किंमत २५ हजार रुपये), स्कॉर्पिओ गाडी (क्र. MH 25 A 2077) तसेच निळ्या रंगाच्या कॅनमध्ये असलेले सुमारे ३५ लिटर डिझेल (अंदाजे किंमत ३ हजार १८५ रुपये) असा एकूण ५ लाख २८ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

शस्त्र व जमावबंदीचे आदेश
Dharashiv crime news | धडाकेबाज कारवाई: वाशी पोलिसांचा अफूच्या शेतीवर छापा

याप्रकरणी येरमाळा पोलिसांनी आरोपी विकास काळे याच्याविरुद्ध भारतीय शस्त्र कायदा कलम ३ व २५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news