Dharashiv News : तुळजापुरात भाजपची मजबूत पकड

पंचायत समितीवर १८ पैकी १३ उमेदवार विजयी
Dharashiv News
Dharashiv News : तुळजापुरात भाजपची मजबूत पकडpudhari photo
Published on
Updated on

BJP retains Panchayat Samiti by winning 13 seats

डॉ. सतीश महामुनी : तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा

तालुक्याच्या राजकीय पटलावर पंचायत समितीच्या निकालाने आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध झाले, भाजपने, १३ जागा जिंकून पंचायत समिती कायम ठेवली आहे, तर ठाकरे शिवसेना २ जागा, काँग्रेस २ जागा व समाजवादी पार्टी १ जागेवर विजयी झाली आहे. भाजपाचे नेते सुनील मधुकरराव चव्हाण यांचे चिरंजीव रणवीर चव्हाण, सचिन साळुंखे यांच्या पत्नी अनिता साळुंखे, माजी सभापती संतोष बोबडे, विक्रम देशमुख, कृष्णा रोचकरी या उमेदवार चांगल्या मताधिक्याने पंचायत समितीच्या निवडणुकीत विजयी झाले.

Dharashiv News
Paranda news : परंडा पं. स.वर शिंदे शिवसेनेचा झेंडा; भाजप, राष्ट्रवादी, उबाठाला धक्का

पंचायत समितीसाठी काक्रंबा मधून विजयी किसन देडे भाजप ४३२९, पराभूत उमेश पांडागळे ठाकरे सेना १६२९, सलगरा दिवटी विजयी वैभव मर्डे भाजपा २९८९, पराभूत श्यामसुंदर माळी ठाकरे सेना २२७६, काटी - विजयी विक्रम देशमुख भाजप ४४४८, पराभूत सुजित हंगरकर ठाकरे सेना ३००९, सावरगाव विजयी संतोष बोबडे भाजपा ४९१५,

पराभूत शंकर शिंदे काँग्रेस २१६२, खुदावाडी - विजयी भिवा इंगोले भाजपा २००७, पराभूत संजय राठोड काँग्रेस १७८६, नांदगाव विजयी रोहिणी मेलगिरे भाजपा ४३९६, पराभूत ज्योती मोरे ठाकरे सेना ३००३, अणदूर विजयी रणवीर चव्हाण भाजपा ४३७१ पराभूत प्रवीण घुगरे मनसे१६८७, चिवरी- विषयी प्रवीण भोसले भाजपा ३२४८, पराभूत संजय भोसले ठाकरे सेना २७५५, तामलवाडी विजयी संगीता माळी २९९८, पराभूत उषा शिंदे काँग्रेस २४९६, काटगाव विजयी भाग्यश्री शिंदे भाजपा ३४१९, पराभूत संगीता माळी काँग्रेस ३०९३, सिंदफळ विजयी अनिता साळुंखे भाजपा ३४६५, पराभूत सविता नवगिरे ३१०२, अपसिंगा विजय निराग शिरसागर भाजपा २५६९, पराभूत सोनाली शिरसाट१६१२, शहापूर -विजयी मनीषा खरात भाजप २२९९, पराभूत जयश्री कोळी ठाकरे सेना २१४४, येवती विजयी प्रियंका मिटकरी शिवसेना ३५९७, पराभूत नंदा साखरे काँग्रेस ३३४६,

Dharashiv News
Dharashiv News : कळंब तालुक्यात महायुतीची मुसंडी

मंगरूळ-विजयी सोनाली डोंगरे काँग्रेस २९३७, पराभूत रेश्मा सरडे भाजप २६४३, अर्चना डोंगरे अपक्ष १०१८, आरळी विजय कृष्णा रोचकरी समाजवादी पार्टी ३९०१, पराभूत सुरेश कोकरे ठाकरे शिवसेना १२३०, नवनाथ मार्कड भाजपा १९३३, जळकोट -विजयी आशिष सोनटक्के भाजप ३७६३, पराभूत मोहन चव्हाण काँग्रेस २९६४, होर्टी विजयी सुवर्णा गुंजीते भाजपा ३५४०, पराभूत सुकेशनी मोठे भाजप २८४६, हे उमेदवार विजयी झाल्याचे घोषित करण्यात आले. विजयानंतर आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या नावाने विजयाच्या घो-षणा देण्यात आल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news