Dharashiv News : कळंब तालुक्यात महायुतीची मुसंडी

पंचायत समितीत 'फिफ्टी-फिफ्टी' जागा
Dharashiv News
Dharashiv News : कळंब तालुक्यात महायुतीची मुसंडीfile photo
Published on
Updated on

Dharashiv News Mahayuti proved its dominance in six out of eight Zilla Parishad seats

परमेश्वर पालकर

कळंब, पुढारी वृत्तसेवा तालुक्यात जिल्हा परिषदेत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकात महायुती व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेत जोरदार चुरस झालेली दिसून आली यामध्ये महायुतीने जिल्हा परिषदेच्या आठ जागांपैकी सहा जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले तर ठाकरे सेनेला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले तर पंचायत समितीच्या निवडणुकीत ठाकरे सेनेने एकला चलोची भूमिका घेत आठ जागांवर आपले वर्चस्व सिद्ध केले तर भाजपला पाच जागा व शिवसेनेला तीन जागा मिळाल्या यामुळे पंचायत समितीमध्ये कोणाचा सभापती होणार हे उत्सुकतेचे ठरले आहे.

Dharashiv News
धाराशिवमध्ये अपक्षांचा चौकार

विजयी उमेदवारांनी जल्लोष केला तर काही ठिकाणी जिल्हा परिषद महायुती कडे तर पंचायत समिती ठाकरे सेनेकडे गेल्याने आनंदावर विरजण पडले. उपविभागीय अधिकारी गणेश शिंदे, तहसीलदार हेमंत ढोकले नायब तहसीलदार गोपाल तापडीया, गोकुळ भराडीया यांनी योग्य नियोजन केले तर पोलिस उपविभागीय अधिकारी संजय पवार व पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

पंचायत समिती मधील विजयी उमेदवार ईटकूर गणात भाजपचे रामचंद्र नानाभाऊ सांगळे यांना २६८५ तर अपक्ष बाबासाहेब उद्धवराव कोठावळे यांना २६२६ मते मिळाली सांगळे हे ५९ मतांनी विजयी झाले मस्सा गणात शिवसेनेच्या राजश्री धनंजय वरपे यांना ४११२ तर ठाकरे सेनेच्या तुकाराम लक्ष्मण थोरात यांना ३६५५ मते मिळाली वरपे या ४५७ मतांनी विजयी झाल्या.

Dharashiv News
Paranda news : परंडा पं. स.वर शिंदे शिवसेनेचा झेंडा; भाजप, राष्ट्रवादी, उबाठाला धक्का

मंगरूळ पंचायत समिती गणात भाजपच्या प्रणिता प्रणव चव्हाण यांना ३४२० मते मिळाली तर ठाकरे सेनेच्या गायकवाड शारदा अच्युत यांना ३१३० मते मिळाली चव्हाण या २९० मतांनी विजयी झाल्या हासेगाव केज गणातील राणी राऊत यांना ३३६१ तर लक्ष्मी अशोक तोडकर यांना ३३१८ मते मिळाली राऊत या ४३ मतांनी विजयी झाल्या.

डिकसळ पंचायत समिती गणात शिवसेनेचे नामदेव जाधव यांना २४८७ तर ठाकरे सेनेचे सचिन काळे यांना २४५६ मते मिळाली जाधव हे ३१ मतांनी विजयी झाले. लोहटा पूर्व गणात भाजपच्या इंदुबाई बाबासाहेब ओव्हाळ यांना ३८०७ तर ठाकरे सेनेच्या सोनाली अंकुश झोंबाडे यांना २६१० मते मिळाली ओवाळ या ११९७ मतांनी विजयी झाल्या.

शिराढोण गणात भाजपचे गजानन माकोडे यांना २२८८ मते मिळाली तर ठाकरे सेनेचे ज्ञानेश्वर खडबडे यांना १८१५ मते मिळाली माकोडे यांनी ४७३ मतांनी विजय मिळविला.

जवळा खुर्द गणात ठाकरे सेनेचे मनोज घोगरे यांना ३२५८ मते मिळाली तर पांडुरंग घोगरे यांना २०१८ मते मिळाली मनोज घोगरे हे १२०० मतांनी विजयी झाले.

नायगाव गणात ठाकरे सेनेच्या सीमा टेकाळे यांना १९८२ मते मिळाली तर भाजपच्या मनीषा टेकाळे यांना १९२४ मते मिळाली यामध्ये सीमा टेकाळे या ५८ मतांनी विजयी झाल्या. रांजणी गणात ठाकरे सेनेच्या योगेश्वरी पवार यांना २३७१ मते मिळाली तर शिवसे-नेच्या मनीषा देशमुख यांना २१५८ मते मिळाली योगेश्वरी पवार २१३ मतांनी विजयी झाल्या. खामसवाडी गणात ठाकरे सेनेच्या सुवर्णा पाटील यांना २२०० मते मिळाली तर भाजपच्या किरण पाटील यांना १९६४ मते मिळाली सुवर्णा पाटील या २३६ मतांनी विजयी झाल्या.

देवळाली गणात ठाकरे सेनेचे उमाकांत एडके यांना २०७७ मते मिळाली तर सचिन एडके यांना २०३४ मते मिळाली उमाकांत एडके ४३ मतांनी विजयी झाले.

मोहा गणात ठाकरे सेनेच्या अनुराधा दिघे यांना २९७२ मते मिळाली तर अपक्ष उमेदवार पूजा नागटिळक यांना १८६२ मते मिळाली. दिघे या ११०० दहा मतांनी विजयी झाल्या. गौर गणामध्ये ठाकरे सेनेचे श्याम देशमुख यांना ३०६२ मते तर भाजपचे देशमुख तात्यासाहेब यांना २१६८ मते मिळाली देशमुख हे ८९४ मतांनी विजयी झाले.

येरमाळा गणात ठाकरे सेनेच्या वृषाली पाटील यांना ४,१७५ मते मिळाली तर भाजपच्या बारकुल उषाबाई यांना ३६५५ मते मिळाली पाटील या ५२० मतांनी विजयी झाल्या चोराखळी गणात भाजपच्या अलका खुने यांना ३१४६ मते मिळाली तर ठाकरे सेनेच्या ओव्हाळ शिल्पा यांना २९१० मते मिळाली खुणे या २३६ मतांनी विजयी झाल्या.

जिल्हा परिषदेच्या आठ गटांतील निकाल

जिल्हा परिषदेच्या आठ गटामध्ये ईटकुर गटात शिवसेनेचे अनंत नानासाहेब लंगडे ६९४३ तर पल्लवी बळवंतराव तांबारे यांना ४,८६१ मते पडली आहेत लंगडे हे २००० मतांनी विजयी झाले आहेत.

मंगरूळ जिल्हा परिषद गटात जयवंत रामभाऊ कुंभार यांनी ६२०० मते मिळविली तर त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे सेनेचे बालासाहेब धनराज जाधवर यांना ५३१३ मते मिळाली आहेत कुंभार हे ८८७मतांनी विजयी झाले.

डिकसळ गटामध्ये शिवसेनेच्या पूजा तुषार शिंदे यांना ५९५३ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे सेनेच्या वर्षा संजीत मस्के यांना ४५५७ मते मिळाली आहेत शिंदे या १३९६ मतांनी विजयी झाले आहेत.

शिराढोण गटामध्ये ठाकरे सेनेच्या कांचनमाला उत्कर्ष संगवे यांना ४८८७ मते मिळाली असून त्यांचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नितीन लक्ष्मण यादव यांना ४८५३ मते मिळाली आहेत संगवे या ३४ मतांनी विजयी झाले आहेत.

नायगाव गटामध्ये भाजपचे उद्धव बाजीराव शितोळे पाटील यांना ५३२२ मते मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी ठाकरे सेनेचे अनिल राजाभाऊ साळुंखे यांना ५२०९ मते मिळाली पाटील हे ११३ मतांनी विजयी झाले आहेत.

खामसवाडी गटात भाजपचे विश्वास हनुमंत कोकणे यांना ४०३० तर त्यांच्या प्रतिस्पर्धी ठाकरे सेनेच्या मनीषा बालाजी वाघमारे यांना ३५७१ मते मिळाली कोकणी ही ४५९ मतांनी विजयी मोहा जिल्हा परिषद गटामध्ये ठाकरे सेनेचे रूपाली बालाजी नागटिळक यांना ५४९७ मते मिळाली तर अपक्ष सुजाता गौतम मडके यांना ४१२१ मते मिळाली नागटिळक या १३७६ मतांनी विजयी झाल्या.

येरमाळा गटात भाजपच्या कोकाटे अनुजा रामकिशन यांना ७६३९ मते मिळाली तर ठाकरे सेनेच्या सुनंदा सुबराव वाघमारे यांना ६०३३ मते मिळाली कोकाटे या १६०६ मतांनी विजयी झाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news