Paranda news : परंडा पं. स.वर शिंदे शिवसेनेचा झेंडा; भाजप, राष्ट्रवादी, उबाठाला धक्का

या निवडणुकत परंडा तालुक्यात शिवसेना शिंदेला अघाडी मिळाली आहे, तर भाजपसह उबाठा व राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.
Paranda news
Shiv Sena Pudhari
Published on
Updated on

Paranda news: Shinde Shiv Sena's flag on Paranda Panchayat Samiti; A blow to BJP, NCP, Ubatha

संतोष शिंदे

परंडा : परंडा तालुक्यासह जिल्ह्यात पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले असून, काही ठिकाणी अपेक्षित निकाल लागले असले, तरी अनेक मतदारसंघात चुरशीच्या लढतीत अनेकांनी बाजी मारली आहे. या निवडणुकत परंडा तालुक्यात शिवसेना शिंदेला अघाडी मिळाली आहे, तर भाजपसह उबाठा व राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

Paranda news
Dharashiv Crime : तुळजापुरात पुन्हा बंदुकीचा धाक; हॉटेलसमोर गोळीबार, शहरात खळबळ

परंडा पंचायत समिती दहा गणांत शिवसेना शिंदे पक्षाने बाजी मारली असून शिवसेना शिंदे पक्षाचे शेळगाव गण रेश्मा गायकवाड, चिंचपूर गणातून गणेश भिल्लारे, आनाळा गणातुन मालन कोलते, जवळा गणातुन परसु गवारे, सोनारी गणातून समाधान नलवडे, वडणेर गणातून आर्चना जाधव आदी उमेदवार विजयी झाले असून तालुक्यात शिंदेसेनेचे सर्वाधिक उमेदवार विजयी झाले आहेत.

तर इतर खासापुरी गणातून राष्ट्रवादीच्या दीपाली खुळे, शिरसाव गणातुन भाजपाच्या मोनिका पाटील, लोणी गणातून उबाठच्या धनश्री लोकरे, डॉजा गणातून राष्ट्रवादीचे पंकज पाटील हे विजयी झाले आहेत. परंडा जिल्हा परिषद पाच गटात शेळगाव गटात शिव सेना शिंदे गटाचे आमर मोरे, आनाळ गटात वैशाली डोके, जवळा गटात भाजप पुरस्कृत अपक्ष धनंजय सावंत, डोंजा गटात राष्ट्रवादीचे भाऊसाहेब खरसडे, लोणी गटात उवाठा पुरस्कृत राणी ढोरे, आदी उमेदवार विजय झाले असून शिवसेना शिंदे पक्षाचे सर्वाधिक म्हणज दोन उमेदवार विजयी झाले आहेत.

Paranda news
धाराशिवमध्ये अपक्षांचा चौकार

निवडणूक प्रक्रियेदरम्यान शांततेत मतदान पार पडले होते. मतमोजणीदरम्यान कार्यकर्त्यांची गर्दी, जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके व गुलाल उधळत जल्लोष करत आनंद व्यक्त केला. निकालानंतर आता सभापती, उपसभापती तसेच जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी राजकीय हालचालींना वेग येणार असल्याचे संकेत मिळत आहेत. पुढील काही दिवसांत सत्ता स्थापनेबाबत चित्र स्पष्ट होणार आहे.

जिल्हा परिषद गटांमध्ये शेळगाव आमर गटातून शिवसेना गटाचे सुभाष मोरे यांनी ५,१९६ मते मिळवत विजय मिळवला, तर भाजपचे शरद पवार यांना ४,११८ मते मिळाल्याने त्यांचा पराभव झाला. आनाळा गटात शिवसेना (शिंदे) च्या वैशाली चंद्रकांत डोके यांनी ६,७१८ मते घेत बाजी मारली; राष्ट्रवादीच्या जयश्री दत्तात्रय पाटील यांना ४,६३२ मते मिळाली. जवळा गटात भाजप अपक्ष धनंजय उत्तम सावंत ६,५१७ मतांसह विजयी ठरले, तर शिवसेना (शिंदे) चे रमेश उत्तम कारकर ४,५९६ मतांवर पराभूत झाले.

लोणी गटातून उबाठाअपक्ष राणी रेवणनाथ ढोरे यांनी ७,३३२ मते मिळवून विजय मिळवला; शिवसेना (शिंदे) च्या अनिता महालिंग राऊत यांना ३,८९७ मते मिळाली. डोंजा गटात राष्ट्रवादीचे भाऊसाहेब बाबासाहेब खरसडे ६,२४० मतांसह विजयी ठरले, तर आविदाबाई भागवत जगताप यांना ५,४४० मते मिळाली.

पंचायत समिती गणांमध्ये चिंचपूर (बु.) गणातून शिवसेना (शिंदे) चे गणेश बाबूराव भिल्लारे यांनी २,८३८ मते घेत विजय मिळवला, भाजपचे एकनाथ पंढरीनाथ वायसे २,००४ मतांवर पराभूत झाले. शेळगाव गणात शिवसेना (शिंदे) च्या रेश्मा अशोक गायकवाड ४,५३२ मतांसह विजयी ठरल्या; राष्ट्रवादीच्या आश्विनी दीपक भांडवलकर यांना २,५९७ मते मिळाली. आनाळा गणात शिवसेना (शिंदे) च्या मालन दादाराव कोलते यांनी ३,०९२ मते घेत बाजी मारली; राष्ट्रवादीचे आमोल प्रकाश भोजने २,००४ मतांवर पराभूत झाले. खासापुरी गणात राष्ट्रवादीच्या दीपाली महेश खुळे २,४७८ मतांसह विजयी ठरल्या, तर शिवसेना (शिंदे) च्या सीमा दिनकर खैरे यांना २,०३८ मते मिळाली. डोंजा गणात राष्ट्रवादीचे पंकज गोपाळ पाटील २,६२८ मतांसह विजयी झाले; शिवसेना (शिंदे) चे शशिकांत चंद्रकांत पाटील २,०५५ मतांवर पराभूत झाले.

सोनारी गणात शिवसेना (शिंदे) चे समाधान सुभाष नलवडे २,२७४ मते मिळवत विजयी ठरले; उबाठाचे तानाजी कल्याण पाटील २,१८६ मतांवर पराभूत झाले. जवळा गणात शिवसेना (शिंदे) चे परसु चंद्रकांत गवारे २,५९२ मतांसह विजयी ठरले; राष्ट्रवादीचे हनुमंत रामलिंग कातुरे २,१५४ मतांवर पराभूत झाले. सिरसाव गणात भाजपच्या मोनिका केदार पाटील २,५६३ मतांसह विजयी झाल्या; शिव-सेना (शिंदे) च्या राधिका शिवाजी जाधव यांना २,४९६ मते मिळाली. लोणी गणात उबाठाच्या धनश्री विश्वास लोकरे ३,००९ मतांसह विजयी ठरल्या; शिव-सेना (शिंदे) च्या रेखा गुलाब शिंदे २,५१६ मतांवर पराभूत झाल्या. वडनेर गणात शिवसेना (शिंदे) च्या आर्चना आप्पासाहेब जाधव २,७५५ मते मिळवत विजयी ठरल्या; अपक्ष शैला अशोक वेताळ यांना २,५६६ मते मिळाली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news