माजी नगरसेवक राहुल खपले यांचा शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश | पुढारी

माजी नगरसेवक राहुल खपले यांचा शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश

तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा : दिवंगत माजी आमदार माणिकराव खपले यांचे नातू माजी नगरसेवक राहुल खपले यांनी आज (दि.८) ‘उबाठा’चे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. शिवसेना पक्षाच्या आयोजित जनसंवाद यात्रा सभेच्या व्यासपीठावर आपल्या समर्थकांसह त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

तुळजापुरच्या राजकारणामध्ये ५० वर्ष शेतकरी कामगार पक्षाचे आमदार आणि नगराध्यक्ष म्हणून दिवंगत माजी आमदार माणिकराव खपले यांनी काम केले आहे. माजी नगरसेवक राहुल खपले हे त्यांचे नातू आहेत. राहुल खपले यांनी उमेश भिसे, नवनाथ जगताप, राज खपले ,आनंद क्षिरसागर, अनमोल साळुंखे, बापूसाहेब दळवी, राहुल पोळ, विनायक कोळी या आपल्या कार्यकर्त्यांसह आज शेकापाला रामराम करीत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला.

यावेळी धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा सहसंपर्क प्रमुख नदुंराजे निंबाळकर , महिला जिल्हाप्रमुख शामलताई वडणे-पवार, श्याम पवार, तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, युवासेना तालुकाप्रमुख प्रतीक रोचकरी, ,प्रेमकदम परमेश्वर, सागर इंगळे, लखन कदम, राजअहमद पठाण, कमलकर चव्हाण, सरदारसिग ठाकूर, अर्जुन साळुंखे, बाळासाहेब शिंदे, बापूसाहेब नाईकवाडी, विकास भोसले, चेतन बंडगर, शाम माळी उपस्थित होते.

हेही वाचा : 

 

Back to top button