CM Eknath Shinde: वडगावच्या विकास आराखड्याला अखेर स्थगिती; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

CM Eknath Shinde: वडगावच्या विकास आराखड्याला अखेर स्थगिती; मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा
Published on
Updated on

किणी; पुढारी वृत्तसेवा : वडगाव शहरातील नागरिकांसाठी अन्यायकारक ठरलेला वडगाव विकास आराखड्याला हद्दवाढ होईपर्यंत स्थगिती दिली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.८) केली. तसेच शहरातील घरकुलासाठी जमीन हस्तांतरण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. CM Eknath Shinde

पेठ वडगाव नगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या आणि 'शिवराज्यभवन' बांधण्याच्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झाला. यावेळी आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. CM Eknath Shinde

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, सरसेनापती धनाजीराव जाधव यांच्या स्मारकाच्या कामासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. शहराबाहेरून रिंगरोड काढण्याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्यास सूचना देऊन त्यासंबंधीची कार्यवाही लवकरच सुरू करू. घरकुलासाठी भूखंड हस्तांतरण तातडीने करण्यात येत आहे. वडगावकरांसाठी अन्यायकारक असणारा वडगाव विकास आराखडा हा हद्दवाढ झाल्यानंतरच राबविण्यात येईल. तोपर्यंत या विकास आराखड्यास स्थगिती देण्यात येईल.

खासदार धैर्यशील माने यांनी यावेळी बोलताना वडगाव शहरास ऐतिहासिक महत्व असल्याने हद्दवाढ झाल्याशिवाय विकास आराखडा राबवू नये, सरसेनापती धनाजीराव जाधव स्मारकासाठी तसेच नगरपालिका प्रशासकीय इमारतीसाठी वाढीव निधी तसेच प्रलंबित असणाऱ्या ५०५ पंतप्रधान आवास योजनेतील घरकुलांसाठी जमीन हस्तांतरण करून देण्याची मागणी केली.

यावेळी विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक, आ. राजूबाबा आवळे, माजी उपनगराध्यक्ष अजय थोरात, सुकुमार पाटील, शरद पाटील, सुनीता पोळ, सावित्री घोटणे, अक्षय मदने, नम्रता ताईंगडे, अलका गुरव, अभिनंदन सालपे, प्रकाश बुचडे आदीसह आजी- माजी नगरसेवक व कार्यकर्ते उपस्थित होते. माजी नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. युवक क्रांती आघाडीच्या नेत्या प्रविता सालपे यांनी आभार मानले.

'दै. पुढारी'च्या आजच्या (शुक्रवार) अंकात मुख्यमंत्री शिंदे यांचा दौरा पथ्यावर पडणार ? या मथळ्याखाली वडगाव विकास आराखडा रद्दची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याप्रमाणे शिंदे यांनी हद्दवाढ होईपर्यंत आराखडा स्थगित करण्याची घोषणा केल्याने पुढारीचा अंदाज खरा ठरला. याबद्दल अनेकांनी 'दै. पुढारी'चे अभिनंदन केले.

हेही वाचा 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news