छत्रपती संभाजीनगर : मोती तांडा येथे खराब रस्त्यामुळे तरुणाचा मृत्यू

संतप्त नातेवाईकांचा खेर्डा ग्रामपंचायतीचा घेराव
Young boy died Due To Bad Road Condition
संताप जमावाने ग्रामपंचायतीला घातलेला घेरावPudhari Photo
Published on
Updated on

पैठण पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील खेर्डा ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या मोती तांडा या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी रस्ता नाही. यामुळे तीन दिवसांपूर्वी या परिसरातील प्रमोद संपत चव्हाण (वय २५) या तरुण युवकाचा शॉक लागल्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.१) रोजी घडली. शनिवारी (दि.३) सकाळी दहा वाजता मयत झालेल्या तरुणाच्या नातेवाईकांनी तात्काळ रस्ता करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवक खंडू वीर यांना निवेदन देण्यासाठी आले होते. परंतु, ग्रामसेवक गैरहजर असल्यामुळे खेर्डा ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घातला आहे.

Young boy died Due To Bad Road Condition
पैठण : खातेदारांच्या फसवणूक प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक शाखेच्या मॅनेजरला अटक

अधिक माहिती अशी, गुरुवारी (दि.१) सकाळी खेर्डा ग्रामपंचायत कार्यालय अंतर्गत असलेल्या मोती तांडा येथील रहिवासी प्रमोद संपत चव्हाण या तरुणाला विद्युत शॉक लागल्याने जखमी झाला होता. सदरील तरुणाला तात्काळ उपचार मिळावा यासाठी नातेवाईकांनी पैठण येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात होते. या मोती तांड्याचा रस्ता हा ना दुरुस्त आणि खराब असल्यामुळे युवकाला वेळेच्या आत उपचार न मिळाल्यामुळे मृत्यू झाला होता. सदरील तरुणाला केवळ रस्त्यामुळे आपला जीव गमावावा लागला.

Young boy died Due To Bad Road Condition
म्हाडा फ्लॅटच्या नावाने महिलेची २३ लाखांची फसवणुक

संतप्त झालेले नातेवाईकांनी खेर्डा ग्रामपंचायत अंतर्गत रस्ते दुरुस्ती करून मिळावा. यासाठी नातेवाईक आणि युवकांनी ग्रामपंचायत कार्यालयाला घेराव घातला असून जोपर्यंत सतत गैरहजर राहणाऱ्या ग्रामसेवक येऊन निवेदन घेत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायत परिसरातून नातेवाईक बाहेर जाणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news