पैठण : खातेदारांच्या फसवणूक प्रकरणी ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक शाखेच्या मॅनेजरला अटक

आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने केली कारवाई
Money Fraud By Dnyanradha Multistate Bank
ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक शाखा पैठणPudhari Photo
Published on
Updated on

पैठण, पुढारी वृत्तसेवा : ज्ञानराधा मल्टी स्टेट बँकेच्या माध्यमातून पैठण तालुकासह बीड जिल्ह्यातील खातेदारांची फसवणूक करून कोटयावधी रुपयाचा गंडा घातला होता. या प्रकरणी तिरूमला उद्योग समूहाचे आणि ज्ञानराधा मल्टी स्टेट शाखा पैठणचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे, पत्नी अर्चना कुटे सह पैठण शाखा मॅनेजर वैजनाथ अण्णा डाके विरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Money Fraud By Dnyanradha Multistate Bank
ज्ञानराधा मल्टीस्टेटचे चेअरमन आणि बँक कर्मचाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

तेव्हापासून मॅनेजर डाके फरार होता. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हा शाखेचे पोलीस पथक करीत असताना सदरील मॅनेजर छत्रपती संभाजीनगर येथील सिडको बस स्थानक येथे असल्याची माहिती प्राप्त झाल्याने आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी (दि.27) रात्री मॅनेजर वैजनाथ डाके याला अटक केली आहे. आरोपी मॅनेजरला न्यायालय समोर हजर केले असता न्यायालयाने दि.२ ऑगस्ट पर्यंत सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ज्ञानराधा मल्टीस्टेट बँके शाखेच्या माध्यमातून ज्यादा व्याजदर देण्याच्या आमिष दाखवून पैठण येथील पन्नासहुन अधिक खातेदारांचे ठेव जमा करून घेतली होती.

Money Fraud By Dnyanradha Multistate Bank
ज्ञानराधा मल्टीस्टेटला ठेवीदारांचा पैसा लुटू देणार नाही : सईद खान

सदरील खातेदारांना आपले पैसे परत मिळत नसल्यामुळे दि.८ जुलै रोजी पैठण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांच्याकडे ३ कोटी ६९ लाख ८० हजार रुपये फसवणूक झाल्याबद्दल तक्रार करण्यात आली होती. या बँकेमार्फत अनेक खातेदाराची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्यामुळे पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया, अप्पर पोलीस अधीक्षक सुनिल लांजेवार, उपविभागीय पोलिस अधिकारी सिद्धेश्वर भोरे, पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सदरील तपास छत्रपती संभाजीनगर ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रशांत शिंदे यांच्याकडे देण्यात आला होता. तपास करीत असताना गोपनीय माहितीनुसार सदरील वैजनाथ डाके मॅनेजर सिडको बस स्थानकावर असल्याची माहिती प्राप्त झाल्याने या मॅनेजरला तात्काळ अटक करण्याची कारवाई पोलीस निरीक्षक प्रशांत मदन शिंदे, सहाय्यक फौजदार रोहिदास तांदळे, जमादार कुवरसिंग ठाकूर, जमादार बाबाराव होळंबे, स्थानिक गुन्हे शाखेचे रवी लोखंडे, चालक आजिनाथ तिडके यांनी केली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news