

Young woman caught breaking house lock and stealing money
छत्रपती संभाजीनगर, पुढारी वृत्तसेवा : नेहरूनगर येथे कुलूप तोडून पैसे चोरी करणाऱ्या तरुणीला रंगेहात पकडले. ही घटना गुरुवारी (दि.१) रात्री आठच्या सुमारास घडली. उजमा शेख मोहम्मद (२२, रा. नेहरूनगर) असे आरोपीचे नाव आहे. तिच्या अंगझडतीत १० हजार ४०० रुपये मिळून आले. तिला जिन्सी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
फिर्यादी शेख आस्मा शेख तौफिक (२५, रा. नेहरूनगर) यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या लहान बहिणीचे चेलीपुरा येथे लग्नाचे रिसेप्शन असल्याने कुटुंबीयांसह त्या घराला कुलूप लावून गेल्या होत्या. कार्यक्रमात असताना त्यांच्या मोबाईलवर वडिलांचा फोन आला. घराला कुलूप लावले होते का? दाराचे कुलूप तुटलेले दिसत असून आत कोणीतरी आहे.
असे सांगितले. आस्मा यांच्यासह नातेवाईकांनी तात्कळ घराकडे धाव घेतली. बराच वेळ दार वाजवून उघडले जात नसल्याने दार तोडून आत गेल्यावर सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले होते. आत त्यांच्या आईकडे वर्षभरापूर्वी भाड्याने राहत असलेली उजमा शेख दिसून आली. याप्रकरणी जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.